Kalyan: कल्याण येथील आदिवासींच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर उभारले जाणार सार्वजनिक शौचालय
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Kalyan: यंदाचा प्रजासत्ताक दिन हा जवळजवळ 100 आदिवासी नागरिकांसाठी आनंदाचा ठरला. कारण बिर्ला महाविद्यालयाच्या येथे राहणाऱ्यांना अखेर प्रदीर्घ संघर्षानंतर आता सार्वजनिक शौचालये उभारुन दिली जाणार आहेत. यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने याचे बांधकाम 26 जानेवारी पासूनच सुरु केले आहे.(Aurangabad Municipal Corporation Election 2022: 'बायको पाहिजे बायको! जातीची अट नाही' औरंगाबाद येथे उमेदवारीसाठी उतावीळ तरुणाची बॅनरबाजी)

मुंबईपासून 45 किलोमीटर असलेल्या कल्याण शहरात आदिवासा पाडा आहे. शासकीय वृत्तालेखात ती जागा म्हाडाची असल्याचा उल्लेख आहे. काटकरी समाजातील हे आदिवासी येथे काही दशकांहून येथे राहत आहेत. येथील लोक हे शहरात सामान वाहून नेण्याचे काम करतात त्यामुळे त्यांचे घर त्यावर चालते. आदिवासींनी असे सांगितले की, दशकापूर्वी आम्ही शौच करण्यासाठी गावातील जंगलात जात होते. परंतु सध्या खुप इमारती उभारण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांना शौच कुठे करायचा अशी समस्या उद्भवली होती.

आदिवासी गुरुनाथ वाघे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले की, या परिसरात खुप इमारती उभारण्यात आल्या. त्यामुळे नाल्याच्या येथे शौच करण्यासाठी जाण्यासाठी आम्हाला अंधार होई पर्यंत वाट पहावी लागत होती.तसेच राहत्या ठिकाणापासून 200 किमी अंतरावर शौचालय होते आणि तेथे सुद्धा फार गर्दी असते.(Kishori Pednekar Visit Aquatics Gallery: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अहमदाबाद, गुजरात येथील Aquatics Gallery ला दिली भेट)

परंतु आता कार्यकर्ता राहुल देठे यांच्या प्रयत्नामुळे यावर तोडगा निघाला आहे. त्यांनी नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल ट्राइब्स, दिल्ली येथे तक्रार केल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेने यामध्ये दखल घेतली. गेल्या वर्षात ऑक्टोंबर महिन्यात महापालिकेने आम्हाला तत्काळ शौचालयांची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. देठे यांनी पुढे असे म्हटले की, नागरिकांना शौचालय बांधून देणे ही सरकारची जबाबदारी आहे.