Jalgaon: महिलांना सुरक्षा मिळावी यासाठी एका बाजूला प्रयत्न केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. अशातच जळगाव मधील एका महिलांच्या वसतीगृहातील लज्जास्पद घटना समोर आली आहे. या वसतीगृहातील तरुणींना त्यांचे कपडे काढून नाचायला भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांसह वसतीगृहाबाहेर पुरुष यात सहभागी असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ही बातमी TV9 यांनी त्यांच्या वृत्तात दिली आहे.
आशादीप महिला वसतीगृहात हा संतापजनक प्रकार घडला असून तेथील काही तरुणींसोबत किळसवाणे कृत्य करण्यात आले. या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा समोर येत तो स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दाखवला गेला. त्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे.(Nagpur: काळी जादू! पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत एका तरूणीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न)
तर गणेश कॉलनीतील वसतीगृहात निराधार, अत्याचार झालेल्या महिला आणि तरुणींच्या राहण्यासह खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते. परंतु या वसतीगृहात काही गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या प्रकरणी जननायक फाउंडेशनच्या अध्यक्षांनी तेथील महिला आणि तरुणींची भेट घेत त्यांच्याकडून नेमकी काय प्रकार घडला हे जाणून घेतले. त्यावेळी त्यांनी 1 मार्चला काही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अन्य पुरुषमंडळी सुद्धा वसतीगृहात आले. तेव्हा त्यांनी तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास जबरदस्ती केल्याची पीडितांनी म्हटले आहे.(Thane: कल्याण मधील वृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या, कारण अद्याप अस्पष्ट असल्याने पोलिसांकडून अधिक तपास सुरु)
दरम्यान, याआधी सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीत महिलांवर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते. तर काही ठिकाणी आयसोलेशन सेंटर मध्ये महिलांचे लैंगिण शोषण केल्याची बाब याआधी सुद्धा समोर आली होती. या प्रकरणी स्थानिक प्रशासनाकडून गंभीर दखल घेत आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई केली होती.