काळ्या जादूने 50 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत एका तरूणीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार महाराष्ट्रातील (Maharashtra) नागपूर (Nagpur) जिल्ह्यात घडला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. संबंधित तरूणीच्या तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, तरूणीने ऐनवेळी समजदारी दाखवली नसती तर, तिच्यासोबत कोणताही धक्कादायक घटना घडण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.
पीडित तरूणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला काही दिवसांपूर्वी श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखविणारी एक व्यक्ती भेटली होती आणि त्यासाठी त्याने काही अटी ठेवल्या होत्या. या मुलीने अटी पूर्ण केल्यास काळ्या जादूमुळे आकाशातून 50 कोटी रुपयांचा पाऊस पडेल आणि ती श्रीमंत होईल, असे त्या व्यक्तीने सांगितले होते. त्यावेळी तरूणीने त्याच्यावर विश्वास ठेवला. मात्र, त्या व्यक्तीने तरूणीला विवस्त्र होण्यास सांगितले. तरूणी दुर्लक्ष करूनही तो तिच्यावर दबाव आणत होता. यावर तरूणीला शंका आल्यानंतर तिने लकरगंज पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. हे देखील वाचा- Nagpur: शारीरिक सुख आणि दीड लाखांची सुपारी देऊन प्रियकराचा काढला काटा; प्रेयसीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी गणेश खापरे (वय 20), दिनेश महादेव निखारे (वय 25), रामकृष्ण दादाजी म्हसकर (वय 41), विनोद जयराम मसराम (वय 42) आणि डीआर उर्फ सोपान हरिभाऊ कुमरे (वय 35) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध ब्लॅक मॅजिक अॅक्ट, पॉक्सो व इतर कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला.