Nagpur: शारीरिक सुख आणि दीड लाखांची सुपारी देऊन प्रियकराचा काढला काटा; प्रेयसीला अटक
Image used for representational purpose

शारीरिक सुख आणि दीड लाखांची सुपारी देऊन प्रियकराची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कुहीतील सालईमेंढा येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी कुही पोलिसांनी प्रेयसीसह अन्य तिघांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या हत्याकांडाचा पर्दाफाश केला. तसेच शारीरिक सुख व दीड लाख रुपयांची सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.

चंदू गंगाधर महापूर (वय, 30) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. चंदू हा पाचगाव येथील रहिवाशी असून त्याचे एका तरूणीसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी संबंधित तरुणीला पाहण्यासाठी एक मुलगा आला होता. दोघांनी एकमेकांना पसंद केले, परंतु, याबाबत चंदूला कळाल्यानंतर त्याने तरूणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. त्यावेळी तरूणीच्या आई-वडिलांची त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंदू ऐकत नव्हता. त्यानंतर तरूणीने चंदू काटा काढण्यासाठी तिने भारत वसंता गुजरला (वय, 25) गाठले. तसेच 'तू चंदूचा कायमचा काटा काढला तर, मी तुला शरीरसुख देईल', असे ती म्हणाली. त्यानंतर भारत तरूणीच्या आई वडिलांनाही भेटला. त्यांनी चंदूला मारण्यासाठी दीड लाख रुपये देऊ केले. हे देखील वाचा- Wardha Gol Bazar Market Fire: वर्ध्या शहरातील गोल बाजार परिसरात भीषण आग; भाजी विक्रेत्यांची 10 ते 15 दुकाने जळून खाक

त्यानंतर चंदूचा काटा काढण्यासाठी भारतने त्याला पाचगावमधील देशी दारूच्या दुकानात घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर भारतने चंदू भरपूर दारू पाजली. दारून पाजल्यानंतर त्याने चंदूला खदान येथे नेले. दरम्यान, त्याच्याशी वाद घालत त्याला दगडाने मारहाण केली. त्यानंतर आरीने चंदूचा गळा कापला व मृतदेह खदानीत फेकला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.