Murder | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

कल्याण (Kalyan) मधील बाजारपेठ परिसरात राहणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेची राहत्या घरी गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याची माहिती दिली जात आहे. हंसाबाई ठक्कर असे महिलेची ओखळ पटली आहे. हंसाबाई या पतीच्या निधनानंतर घरात एकट्याच राहत होत्या. परंतु ठक्कर यांच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.(Nashik Accident: काळाचा घाला! मालवाहू वाहनाने चिरडल्यामुळे दोन तरुणांचा जागीच मृत्यू; नाशिक येथील धक्कादायक घटना)

ही घटना शनिवारी रात्री समोर आली असून ठक्कर यांची मुलगी सुद्धा त्याच परिसरात राहते. ती आईच्या घरी पोहचली असता तिने तिच्या कोणत्याच फोनचे उत्तर दिले नाही. त्यामुळे ठक्कर यांच्या मुलीने घराचा दरवाजा उघडला असता तिला आईच्या मृतदेहाभोवती रक्ताचा थारोळ्या दिसून आल्या. यामुळे तिने तातडीने पोलिसांना कळवले असता त्यांनी ठक्कर यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.(Prank Video: प्रॅंकच्या नावाने अश्लील व्हिडिओ बनवून फेसबूक, युट्यूबवर करायचे अपलोड; 3 जणांना अटक)

ठक्कर यांनी त्यांचे सर्व दागिने आपल्या मुलीकडे दिल्याचे पोलिसांना कळले. पण ते सुद्धा सुरक्षित असल्याची खात्री पोलिसांनी करुन घेतली. बाजारपेठ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस यशवंत चव्हाण यांनी असे म्हटले की, ठक्कर यांच्या हत्येमागील अद्याप कारण कळू शकलेले नाही. त्यामुळे सध्या या प्रकरणी सर्व दृष्टीने तपास केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.