Devendra Fadnavis | (Photo credit : facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या निकालानंतर राज्यातील राजकारणात बऱ्याच हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. ही निवडणूक भाजप- शिवसेनेने एकत्र लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु झाली होती. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत हात मिळवणी करून राज्यात नवे सरकार उभे केले होते. परंतु, हे सरकार केवळ दोन दिवसांतच कोसळले होते. ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीससाठी यांना या धक्क्यातून सावरायला दोन दिवस लागली होती, असे त्यांनी पत्रकार राजू परूळेकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले आहे.

या विशेष मुलाखातीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात अशी कल्पना मला केंद्रिय नेतृत्वाने दिली होती. केंद्रिय नेतृत्व मला सारखे तुम्हाला लीड करायचे आहे, असे सांगत होते. त्यामुळे मला कल्पना आली होती की, पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. पण आमच्या पद्धतीनुसार ते कुणाला कळू द्यायचे नव्हते. कुटुंबियांनादेखील यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. अगदी या कानाची दुसऱ्या कानाला देखील खबर पोहचवायची नव्हती. त्यामुळे मी बाहेर कुणालाही काहीही बोललो नाही. त्यामुळे माझा आनंदही बाहेर दिसला नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच ज्यावेळी कुणाला वाटले नव्हते की मुख्यमंत्री होईल. त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो. अन् जेव्हा माझ्यासहित सगळ्यांना माहिती होते की, मुख्यमंत्री होणार आहे त्यावेळी झालो नाही. पण त्याचे दु:ख निश्चित झाले. हे सगळे विश्वास ठेवण्याजोगे नव्हते. आता मी मुख्यमंत्री नाही, यावर विश्वास बसायला मला दोन दिवस लागले. असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- राज ठाकरे यांनी 'ती' भूमिका सोडली तर भाजप-मनसे युती शक्य- देवेंद्र फडणवीस

येथे पाहा संपूर्ण मुलाखत-

महाष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षानी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असून त्यांच्या कामगिरीची संपूर्ण महाराष्ट्रातून कौतूकही होत आहे.