Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) पुणे (Pune) येथे अडकलेल्या मुरकुंबी कुटुंबावर दुःखाचा आघात झाला आहे, मुरुकुंबी यांचा 23 वर्षीय मुलगा सिद्धार्थ मुरुकुंबी हा इंग्लंड मधील University of Central Lancashire येथे शिक्षण घेत होता, 15 मार्च रोजी सिद्धार्थ अचानक आपल्या हॉस्टेल मधून गायब झाला आणि त्यांनतर आता इंग्लडच्या पोलिसांना जवळच्या एका नदी मध्ये सिद्धार्थ याचे प्रेत सापडले आहे. एकीकडे मुलाच्या मृत्यूचे दुःख मुरुकुंबी कुटुंबावर कोसळले असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे हे कुटुंब पुण्यात अडकून पडले आहे परिणामी आता त्यांना मुलाचे अंत्यदर्शन सुद्धा घेता येणार नाहीये. अंतिमतः खास तरतूद करून निदान व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून तरी मुलाचा चेहरा बघता यावा अशी विनंती सध्या मुरुकुंबी कुटुंबाने युके सरकार कडे केली आहे.  सावधान! कोरोनाबाधीत रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या 17 जणांना COVID-19 ची लागण

प्राप्त माहितीनुसार, सिद्धार्थ हॉस्टेल मधून गायब झाल्यावर पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला होता, प्रेस्टन शहरातील रिबल नदीच्या किनारी त्याचे प्रेत आढळते आहे. ही जागा देशातील सुसाईड पॉईंट म्हणून ओळखले जाते. दर 17 दिवसांनी या ठिकाणी एक आत्महत्या होत असते त्यामुळे पोलिसांना सिद्धार्थने आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलिसांनी सिद्धार्थचा मृतदेह रॉयल प्रेस्टन हॉस्पिटल मध्ये नेऊन त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, सिद्धार्थच्या कुटुंबाला त्याच्या अंत्यविधीसाठी इंग्लंडला जाणे तर शक्य होणार नाही असेच दिसत आहे . त्यामुळे सर्व पेपरवर्क करून काही दिवसात जेव्हा सिद्धार्थचे शरीर पोलिसांच्या हवाले करण्यात येईल तेव्हा त्याचे शरीर भारतात पाठवण्याची सोय करावी अशी विनंती मुरुकुंबी यांच्याकडून करण्यात आली आहे.