Mumbai Crime: धक्कादायक! सामानाची डिलिव्हरी करताना महिला ग्राहकाचा नंबर सेव्ह करून डिलिव्हरी बॉयने महिलेला पाठवले अश्लिल व्हिडिओ; गुन्हा दाखल
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai Crime: मुंबईतील मालाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुम्हीही ऑनलाईन शॉपिंग (Online shopping) करत असाल तर सावधान! मालाड (Malad) मध्ये राहणाऱ्या एका महिलेला अश्लील क्लिप, व्हिडिओ कॉल आल्यानंतर तिने गेल्या आठवड्यात मालाड पोलिस स्टेशन गाठले आणि डिलिव्हरी बॉयविरुद्ध तक्रार दाखल केली. डिलिव्हरी बॉयने सामानाची डिलिव्हरी करताना महिला ग्राहकाचा नंबर सेव्ह केला. त्यानंतर आरोपी या महिलेला व्हिडिओ कॉल आणि अश्लील व्हिडीओ पाठवायचा. एवढेच नाही तर डिलिव्हरी बॉय व्हिडिओ कॉल दरम्यान त्याचे प्रायव्हेट पार्टही दाखवत असे.

मालाडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने डिलिव्हरी बॉयविरोधात मालाड पोलिसात तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली. तक्रार मिळताच पोलिसांनी कारवाई करत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, आरोपी त्याच्याकडून पार्सल घेणाऱ्या महिलांचे मोबाईल नंबर सेव्ह करत असे आणि नंतर त्यांना अश्लील व्हिडिओ क्लिप पाठवत असे. मालाड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (हेही वाचा - Mumbai Molestation Case: मुंबई मध्ये चालत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग; 47 वर्षीय व्यक्ती अटकेत)

आरोपीने कबूल केला गुन्हा -

मालाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, डीसीपी अजय कुमार बन्सल, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अधाने आणि पीएसआय धीरज वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला. आरोपीला शुक्रवारी रात्री पुण्यातून पकडण्यात आले. ज्योतिराम बाबुराव मनसुले असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी सांगितले की, पुणे आणि मुंबईतील 20 ते 25 महिलांना फोन करण्यासोबतच व्हिडिओ क्लिपही पाठवण्यात आल्या आहेत. शनिवारी आरोपीला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.