Sharad Pawar Reacts On Ajit Pawar's Rebellion: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीपासून स्वतःला दूर केलं असून हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगत त्यांच्या कृतीला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जुळवून घेण्यासाठी सर्वांचा पाठिंबा आणि आशीर्वाद असल्याचा दावा केल्यानंतर काही वेळातच शरद पवारांची पत्रकार परिषद झाली.
अजित पवार यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, मला आनंद आहे की पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीच्या काही सहकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केले आहे. कारण त्यांना आता सरकारमध्ये मंत्री म्हणून समाविष्ट केले गेले आहे. जे घडले त्याची मला काळजी नाही. (हेही वाचा -Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सरकारमध्ये सामील झालो, अजित पवारांनी केले स्पष्ट)
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, ममता बॅनर्जी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन आला. त्यांनी पाठिंबा दिला आहे. कोणी राष्ट्रवादीवर मालकी हक्क सांगत असेल तर काही हरकत नाही. आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांचा पाठिंबा मागू. मला विश्वास आहे की ते आम्हाला साथ देतील.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे त्यांच्या 40 समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे सरकारमध्ये अजित यांच्यासह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या मंत्र्यांमध्ये छगन भुजबळांसोबतच इतरही अनेक बडे नेते आहेत. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.