महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज मोठा राजकीय भूकंप झाला. 2019 साली सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी राज्य सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सरकारमध्ये दाखल झाल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्याच्या प्रगतीसाठी, राज्यात जास्तीत जास्त निधी यावा यासाठी आम्ही सरकारमध्ये दाखल झाल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते.
पाहा ट्विट -
Newly appointed Maharashtra Deputy CM Ajit Pawar, says "Today, we have decided to support the Maharashtra government and took oath as ministers. There will be a discussion on the portfolios later. Considering all aspects at the national level, we thought that we should support… pic.twitter.com/GxVoo2RWQQ
— ANI (@ANI) July 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)