Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिमेतील खडकपाडा (Khadakpada Police) परिसरात एका इसमाने महिलेला आणि तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलीसांनी संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गिरीश (वय 44 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन तक्रारदार आणि आरोपी हे पती पत्नी आहेत. मात्र ते स्वतंत्र राहतात. दोघांना अपत्यही असून ते महिलेसोबत असते. आरोपीने बुधवारी (5 जुलै) मध्यरात्री महिलेला फोन केला. मात्र, तीने तो स्वीकारला नाही. त्यावरुन आरोपी संतापला. त्याने मध्यरात्रीच पीडितेचे घर गाठून तिला तिला फोन न स्वीकारल्याबद्दल अर्वाच्च भाषेत जाब विचारत शिवीगाळ केली. या वेळी त्याने पीडिता आणि तिच्या मुलाला बेदम मारहाण केली.
पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आरोपी आणि पीडिता हे पती पत्नी आहेत. मात्र, त्यांचे एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे ते परस्परांपासून वेगळे राहतात. असे असले तरी आरोपी पीडितेला वारंवार फोन करतो. तो तीला तू सातत्याने कोठे आहेस, काय करते, कुणासोबत आहेस असे प्रश्न विचारतो. बुधवारी मध्यरात्रीही त्याने असाच फोन केला. मात्र, पीडितेने तो स्वीकारला नाही. त्यामुळे आरोपी चिडला त्याने थेट पीडितेचे घर गाठले आणि तू माझा फोन का स्वीकारत नाहीस. मला प्रतिसाद का देत नाही? कोठे गेली होतीस, असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला मारहाण केली. (हेही वाचा, Wife Birthday Wishes In Marathi: बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा! अर्धांगिनीसाठी बॅनर, स्टेटस अन हटके मेसेज; एका क्लिकवर)
दरम्यान, आरोपीची पत्नी कार्तिकी हिने गिरीशला आपण शिर्डीला गेलो होतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपणास सोडून पत्नी शिर्डीला गेली हे आरोपीला सहन झाले नाही. त्याने तिला बेदम मारहाण केली. सोबतच त्याने मुलालाही मारहाण केली. पत्नी आणि मुलाला माराहणकेल्यावर आरोपी तिथून निघून गेला. त्यानंतर पत्नीने खडकपाडा पोलीस स्टेशन गाठले आणि पतीविरोधात मारहाणीची तक्रार दिली.