Ladki Bahin Yojana | (Photo credit: archived, edited, representative image)

How To Increase Income: लाडकी बहीण योजना (Ladki Bhain Yojana), राज्यातील अनेक महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांचा लाभ देत आहे. त्यामुळे महिला वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अर्थात हा आनंद वाढती महागायी, आर्थिक विवंचना, पैशांची तंगी आणि आव्हाने यांमुळे फार काळ टिकत नाही. असे असले तरी, लाभार्थी महिला हा आनंद दीर्घकाळ टीकवू शकतात. इतकेच नव्हे तर, लाडकी बहीण योजनेतून आलेले पैसे वाढवू (How to Grow Money) सुद्धा शकतात. कसे? घ्या जाणून. हे जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची सूचना अशी की, लक्षात ठेवा जर तुमच्याकडे संयम, बचत आणि लाभासाठी दीर्घकाळ वाट पाहण्याची क्षमता असेल तरच हे फायद्याचे आहे. अन्यथा.. तुमचं जे चाललंय ते चालु द्या.

योजनेची सद्यास्थिती आणि अनेक शंका

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात कायम राहणार असे सांगितले जात असले तरी, ती सरसकट लागू राहील याबाबत काहीच निश्चिती नाही. राज्य सरकारने या योजनेबाब निकष आणि फेरआढावा घेण्याची भाषा सुरु केली आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये असुरक्षीततेचे वातावरण आहेच. सरकारने सुरुवातीला या योजनेचा लाभ सरसकट देण्याची घोषणा केली होती. विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी तो लाभ देण्यातही आला. मात्र, आता महायुती सरकार नव्याने सत्तेत आल्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजना आणि लाडकी बहीण या दोन योजनांपैकी कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येईल. वार्षीक अडीच लाख उत्पन्न आणि चारचाकी वाहन नावावर असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे एक ना अनेक निकष असल्याचे सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ यापुढे नक्की कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. असे असले तरी, लाभार्थी महिलांना आपले पैसे वाढविण्याची संधी आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना 'शेतकरी कर्जमाफी'स मोठा अडसर? माणिकराव कोकाटे यांचे स्पष्ट संकेत)

पैसे वाढविण्याचे सूत्र (How To Increase Money?)

अनेकांना प्रश्न पडला असेल की, प्रति महिना 1500 रुपये इतक्या सर्वसाधारण रकमेमध्ये पैसे कसे वाढवायचे. त्यातही ही सरकरी योजना असल्याने त्यात आपल्याला कसा बदल करता येईल? पण मुद्दा असा की, आम्ही सरकारी योजनेच्या पैशांमध्ये कोणताही बदल करण्याबाबत सूचवत नाही आहोत. आम्ही फक्त त्या पैशांचे तुम्ही काय करावे याबाबत सूचवू पाहतो आहे. अर्थात हा कोणत्याही स्वरुपात आर्थिक सल्ला नाही. केवळ माहिती भर म्हणून काही टीप्स सांगत आहोत इतकेच. लक्षात ठेवा ही योजना सुरु होण्यापूर्वी आपल्याकडे स्वत:चे आर्थिक गणित होते. त्यानुसारच आपण पैशांची आवक-जावक आणि गुंतवणूक होत असे. ही योजना सुरु झाल्यावर मिळमारा लाभ हा आपल्याकडे अतिरिक्त पैसे उपलब्ध करुन देतो आहे. त्यामुळे त्याला आपण बोनस म्हणून गृहित धरु शकता. तो तसा गृहीत धरल्यास पैसै वाढविण्याबाबत तपशील खाली प्रमाणे:

  • पैसा साठवा पैसा वाढवा: प्रति महिना मिळणारे 1500 रुपये आपण आपल्या बँक खात्यावर मुदत ठेव रुपात साठवू शकता. (उदा. 1500*12 = 18000) या योजनेंतर्गत वार्षिक मिळणारे 1800 आपण एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझीट रुपात ठेवल्यास त्यावर वर्षाला चांगले व्याज मिळेल. ज्यामुळे तुमचा पैसा वाढू शकतो.
  • सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP): एसआयपी ही म्युच्युअल फंड्स तर्फे गुंतवणूकदारांसाठी चालविण्यात येणारी गुंतवणूक योजना आहे. जी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा देते. या प्रकारच्या गुंतवणुकीचा यापूर्वीचा इतिहास पाहता अनेक फंडांनी चांगला परतावा दिला आहे. आपणही चांगल्या फंडाची निवड करुन दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून सांगला परतावा मिळवू शकता. (हेही वाचा, SIP Mutual Funds: म्यूच्युअल फंड गुंतवणुकीत मोठी वाढ; पाच वर्षात मालमत्ता मूल्य 30% वाढून 4.64 लाख कोटी रुपयांवर)
  • शेअर बाजार गुंतवणूक: कोरोना महामारी दरम्यान आलेल्या लॉकडाऊनपासून भारतीय शेअर बाजार बराच वधारला आहे. अनेक रिटेल गुंतवणूकदार बाजारात आल्याने समभागांचे भाव बरेच वाढले आहेत. योग्य आणि शिस्तीचे पालन करुन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना चांगला लाभ झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे आपणही शेअर बाजारात गुंतवणूक करुन आणि चांगले समभाग खरेदी करुन दीर्घकालीन नफा कमवू शकता.
  • छोट्या व्यवसायाची सुरुवात: खरे तर 1500 रुपयांमध्ये काय होते? असा सवाल अनेक लोक उपस्थित करु शकतात. पण त्यातून एकत्रितपणे वार्षिक मिळणारी रक्कम बऱ्यापैकी आहे. सराजिक त्याचा वापर करुन आपण छोटे छोटे व्यवसाय सुरु करु शकता. ज्यामध्ये घरघंटी मेहेंदी डिझाईन, विणकाम, भाजीविक्री यांसारख्या व्यवसायांचा समावेश होतो. या व्यवसायातूनही तुम्हास आर्थिक लाभ होऊ शकतो.

दरम्यान, लाडकी बहीण योजना राज्य सरकारसाठी सध्या 'घशात अडकलेले हाड' ठरत आहे. कारण, या योजनेवर होणारा खर्च आणि त्याचा राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार पाहता. राज्याची स्थिती बरीच अडचणीत आली आहे. त्याचा परिणाम म्हणजे इतर योजना आणि विभागांच्या निधीला मोठीच कात्री लावावी लागत आहे. राज्यावरील कर्जाचा बोजाही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. त्यामुळे ही योजना राज्य सरकार कसे रेटते याबाबत अभ्यासकांच्या मनात चिंता आहे. त्यामुळे मिळालेल्या लाभाची योग्य गुंतवणूक करुन राज्यातील महिला आपली संपत्ती वाढवू शकतात.

(वाचकांसाठी महत्त्वाची सूचना: वरील लेखात आर्थिक गुंतवणुकीबाबत दिलेली माहिती केवळ ज्ञानात भर म्हणून देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक जोखमीच्या आधिन असते. त्यामुळे वाचकांनी अशा प्रकारे माहिती वाचून गुंतवणुकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शिवाय, कोणतीही गुंतवणूक ही स्वत:च्या जबाबदारीवरच करण्यास प्राधान्य द्या. झालेल्या संभाव्य आर्थिक फायदा किंवा नुकसान यास लेटेस्टली जबाबदार राहणार नाही.)