Yavatmal Accident: यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पंबाजमधून नांदेड येथे जात असताना एका इनोव्हा कारचा अपघात झाला आहे. अपघातात एकाच कुटुंबाचा इनोव्हा कार मधील कुटुंब पंजाब येथून नांदेड येथील गुरुद्वारात दर्शनासाठी जात होते त्यावेळी घटना घडली. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. (हेही वाचा- पुणे पोर्श अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या जामीनाविरोधात पुणे पोलीस देणार सर्वाच्च न्यायालयात आव्हान)
मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा गाडी नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चापर्डा गावाजवळ आली असता, यादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे कार थेट समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, इनोव्हा कारचा समोरचा भाग ट्रकच्या खाली घुसला. हा अपघात सकाळच्या वेळीस घडला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुकांची कोंडी झाली होती. कारमध्ये एअरबॅग नसल्यामुळे चालक आणि मागे बसलेले यात्रेकरू जखमी झाले. यात चार जणांचा मृत्यू झाला.
#यवतमाळ जवळील भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू
पंजाबवरून नांदेडला जात असताना एका इनोव्हा कारने थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिला. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना सोम(ता एक) यवतमाळ जिल्ह्यातील #कळंब येथे घडली आहे https://t.co/70rt3tTsNT
— यवतमाळ (@MazeGaon) July 1, 2024
अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ जखमीना रुग्णालयात दाखल केले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती कुटुंबांना देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यात्रेकरून पंजाब येथील होते. गेल्या आठवड्याच समृध्दी महमार्गावर भीषण अपघात झाला होता त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता.