
Navi Mumbai Hit-And-Run Case: नवी मुंबईमधून हिट-अँड-रन (Hit-And-Run Case) ची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री उशिरा महापे-शिळफाटा रोड (Mahape-Shilphata Road) वर एका अज्ञात वाहनाने स्कूटरला धडक दिल्याने 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना महापे चेकपोस्टजवळ मध्यरात्री 12.30 च्या सुमारास घडली. रोहित पिळणकर असे तरुणाचे नाव आहे. तो डोंबिवलीतील पलावा सिटीचा रहिवासी होता. रोहित कामासाठी नवी मुंबईला गेला होता. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो कोपरखैरणेहून ज्युपिटर स्कूटरने घरी परतत होता. महापे-शिळफाटा मार्गावरील चेकपोस्टजवळ येताच एका अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात रोहित गंभीर जखमी झाला.
दरम्यान, यावेळी वाहनचालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत माहिती मिळताचं तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमी रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा -Maharashtra Shocker: यवतमाळ बस डेपोमध्ये ST Bus खाली चिरडली गेल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद)
तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फरार वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध घेण्यासाठी शोध सुरू केला आहे. पुढील तपास सुरू आहे.' हिट अँड रनच्या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (हेही वाचा -Sunil Hekre Dies: समृद्धी महामार्गावर बांधकाम व्यावसायिक सुनील हेकरे यांचा अपघाती मृत्यू)
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यू -
दुसऱ्या एका घटनेत मंगळवार पहाटे 1.30 वाजता मुंबईगोवा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरच्या मागच्या बाजूला कार धडकल्याने ठाण्यातील रहिवासी आदित्य वर्मा (38) यांचा मृत्यू झाला. तसेच इतर 3 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रायगडच्या खांब गावात घडला. चालकाला झोप लागल्याने आणि दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचा संशय आहे. रत्नागिरीतील चिपळूण येथील पर्यटन स्थळांना भेट देऊन कारमधील सर्व प्रवासी घरी परतत होते.