BEST Bus Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Edited Image)

Maharashtra Shocker: यवतमाळ बस स्थानकावर एक दुःखद घटना घडली. जिथे 65 वर्षीय महिला एसटी बसखाली चिरडली गेली. त्यात तिचा मृत्यू झाला आहे. ताई देवसिंह चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातनंतर तिला उपचारा रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यात तिचा मृत्यू झाला. मागून येणाऱ्या बसला पाहून महिला बाजूला होण्याचा प्रयत्न करत होती. मात्र वयामुळे ती लवकर बाजूला होऊ शकली नाही. पुलगावला जाणाऱ्या यवतमाळ डेपो बसच्या ती खाली ती अडकली गेली. बसच्या पुढच्या डाव्या चाकाने तिला गंभीर दुखापत झाली. प्राथमिक उपचारासाठी महिलेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. नंतर तिला नागपूरला हलविण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटी बसखाली आल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू