Hingoli Shocker: हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून राज्य राखीव पोलिस दलातील जवानाने स्वत:च्याच कुटुंबावर गोळीबार (Hingoli Family Shooting Incident) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गोळीबारामध्ये(Fire) जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गोळीबारातील मृतांचा आकडा 2 वर पोहचला आहे. जवानाने केलेल्या गोळीबारामध्ये त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. (Satish Pradhan Dies: ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन)
त्याशिवाय, मेहुण्याचा मृत्यू झाला. तर चिमुकल्यासह 2 जण गंभीर जखमी झाले होते. जखमींवर उपचार सुरू आहेत. हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून विलास मुकाडे या जवानाने स्वतःच्या कुटुंबासह सासूरवाडीत गोळीबार केल्याची घटना 24 डिसेंबर रोजी घडली होती. जवानाने आपल्या कुटुंबावरच बेछुट गोळीबार केला होता. या घटनेत पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता.
तर जवानाचा दीड वर्षांचा मुलगा, सासू आणि मेहुणा गंभीर जखमी झाले होते. आता या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या जवानाच्या मेहुण्याचा देखील मृत्यू झाला आहे. योगेश धनवे असे उपचाादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत गोळीबार करणारा आरोपी पोलिस कर्मचारी विलास मुकाडे याची सासू दीड वर्षांचा मुलगा देखील जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे हिंगोली शहर हादरले होते. गोळीबारानंतर जवानाने घटनास्थळावरून पळ काढला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली. कौटुंबिक वादातून जवानाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.