Photo Credit- X

BRH vs MLS BBL 2024-25 Dream11 Team Prediction: बिग बॅश लीग 2024-25 चा 19 वा सामना 1 जानेवारी रोजी ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स (BRH vs MLS BBL) यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना ब्रिस्बेन येथील द गाबा येथे खेळवला जाणार आहे. ब्रिस्बेन हीटने या स्पर्धेत आता चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोन जिंकले आहेत तर दोन पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुणतालिकेत ब्रिस्बेन हीट संघ 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, मेलबर्न स्टार्सने स्पर्धेत खराब कामगिरी केली आहे. मेलबर्न स्टार्सने स्पर्धेत पाच सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. मेलबर्न स्टार्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स संघ 20 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये ब्रिस्बेन हीटचा वरचष्मा दिसत आहे. ब्रिस्बेन हीटने 20 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर ॲडलेड स्ट्रायकर्सने केवळ 7 सामने जिंकले आहेत. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांमध्ये भिडतात तेव्हा त्यांच्यात चुरशीची स्पर्धा होते. मात्र, ॲडलेड स्ट्रायकर्सला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो.

खेळपट्टीचा अहवाल

ब्रिस्बेनच्या गब्बा येथील खेळपट्टी अतिरिक्त उसळीसाठी आणि नवीन चेंडूसह काही लवकर हालचालीसाठी ओळखली जाते. सुरुवातीचा विकेट्सचा धोका टाळल्यानंतर फलंदाज मधल्या आणि डेथ ओव्हरमध्ये वेगवान धावा करू शकतात. याशिवाय मधल्या षटकातील फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल. आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये या ठिकाणी पहिल्या डावातील सरासरी एकूण धावसंख्या 163 आहे. जो नाणेफेक जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

ब्रिस्बेन हीट विरुद्ध मेलबर्न स्टार्स ड्रीम11 भविष्यवाणी: फलंदाज

कॉलिन मुनरो हा ब्रिस्बेन हीटचा स्फोटक फलंदाज आहे. जो मेलबर्न स्टार्सविरुद्ध मोठी इनिंग खेळू शकतो. याशिवाय नॅथन मॅकस्विनी आणि मॅक्स ब्रायंटला तुमच्या संघात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे दोन्ही खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे ड्रीम11 संघासाठी ते चांगले पर्याय असतील. तर मेलबर्न स्टार्सकडून, तुम्ही बेन डकेट आणि हिल्टन कार्टराईटपैकी एक किंवा दोन्ही तुमच्या संघात ठेवू शकता. संघासाठी ते मोठी खेळी खेळू शकतात.

यष्टिरक्षक संघात कोणाचा समावेश करावा?

ब्रिस्बेन हीटचे जिमी पीअरसन आणि टॉम बँटन हे यष्टिरक्षक आहेत. याशिवाय तुम्ही मेलबर्न स्टार्सच्या सॅम हार्परला तुमच्या ड्रीम 11 टीममध्ये समाविष्ट करू शकता.

ब्रिस्बेन हीट वि मेलबर्न स्टार्स ड्रीम11 भविष्यवाणी: अष्टपैलू आणि गोलंदाजांची निवड

दोन्ही संघ अष्टपैलू खेळाडूंनी भरलेले आहेत. ब्रिस्बेन हीटसाठी मॅट रेनशॉ हा एक चांगला पर्याय असेल. जो बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये चमत्कार करू शकतात. तो अनुभवी खेळाडू देखील आहे. याशिवाय पॉल वॉल्टर हा ब्रिस्बेन हीटसाठीही चांगला पर्याय ठरेल. मेलबर्न स्टार्ससाठी ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, ब्यू वेबस्टर, जोनाथन मर्लो हे चांगले पर्याय असतील. याशिवाय झेवियर बार्टलेट, मिचेल स्वीपसन, स्पेन्सर जॉन्सन, जोएल पॅरिस, ब्रॉडी काउच, पीटर सिडल, उसामा मीर हे गोलंदाज गोलंदाजीत या गोलंदाजांना साथ देऊ शकतात.

सर्वोत्कृष्ट ड्रीम 11 टीम

यष्टिरक्षक: जिमी पीअरसन आणि टॉम बँटन. याशिवाय सॅम हार्परचाही पर्याय आहे.

फलंदाज: नॅथन मॅकस्विनी, बेन डकेट, कॉलिन मुनरो

अष्टपैलू: मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, ब्यू वेबस्टर

गोलंदाज: झेवियर बार्टलेट, स्पेन्सर जॉन्सन, पीटर सिडल

कर्णधार आणि उपकर्णधार: मार्कस स्टॉइनिस (कर्णधार), ब्यू वेबस्टर (उपकर्णधार).

दोन्ही संघांपैकी 11 खेळण्याची शक्यता 

ब्रिस्बेन हीट: टॉम बँटन, जिमी पियर्सन (उपकर्णधार), कॉलिन मुनरो (कर्णधार), नॅथन मॅकस्विनी, मॅट रेनशॉ, मॅक्स ब्रायंट, पॉल वॉल्टर, झेवियर बार्टलेट, मिचेल स्वीपसन, स्पेन्सर जॉन्सन, मॅथ्यू कुहनेमन.

मेलबर्न स्टार्स: बेन डकेट, सॅम हार्पर (wk), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस (c), हिल्टन कार्टराईट, ब्यू वेबस्टर, जोनाथन मर्लो, उसामा मीर, जोएल पॅरिस, ब्रॉडी काउच, पीटर सिडल