Urmila Kothare | Instagram

मुंबईत पोईसर भागामध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या (Urmila Kothare) कारच्या अपघातानंतर तिचा ड्रायव्हर गजानन पाल (Gajanan Pal)  याला अटक करण्यात आली आहे. 28 डिसेंबरच्या मध्यरात्री हा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर पाल आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे दोघांनाही खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी पाल याला अटक केली आहे. दरम्यान पाल याच्या रक्ताचे नमूने देखील घेण्यात आले आहेत. अपघातानंतर एअरबॅग्स उघडल्याने कार मध्ये उर्मिला आणि चालक पाल यांना केवळ जखमा झाल्या आहेत. मात्र जेसीबी वर आदळलेली कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

उर्मिला कोठारेचा अपघात कसा झाला?

उर्मिला कोठारे चित्रीकरण संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, घोडबंदर मार्गे घरी येत असताना हा अपघात झाला आहे. अपघातापूर्वी तिने आपल्या एका सहकलाकाराला जोगेश्वरीला सोडले. त्यांच्या कारच्या बाजूने एक वाहन भरधाव वेगात ओव्हरटेक करून पुढे गेले. अचानक आलेल्या या गाडीला आदळू नये या प्रयत्नात पाल यांचा गाडीवरील कंट्रोल गेला आणि ती पुढे बॅरिकेट्तला आदळली. या अपघातामध्ये मेट्रो च्या दोन मजुरांना उर्मिलाच्या गाडीने उडवलं. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. सम्राटदास जितेंद्र असं मृत मजुराचं नाव आहे तर सुजन रविदास जखमी आहे.

चालक दारूच्या नशेत होता का? याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. अद्याप पुढील अपडेट्स समजू शकलेले नाहीत. नक्की वाचा: Navi Mumbai Accident: पाम बीच रोडवर भरधाव कार उलटली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक जखमी .

उर्मिला कोठारे ही अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगणा आहे. सहा महिन्यांपूर्वी तिच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेमधून ती रसिकांच्या भेटीला आली होती. आता या मालिकेने निरोप घेतला आहे. दरम्यान उर्मिला ही दिग्दर्शक महेश कोठारे यांची सून आणि अभिनेते आदिनाथ कोठारे यांची पत्नी आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून उर्मिला कोठारे कुटुंबासोबत कोठेही दिसलेली नाही.