Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Navi Mumbai Accident: पाम बीच रोड (Palm Beach Road)वर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात (Accident) 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तसेच चालक गंभीर जखमी झाला. करावे जवळ रात्री साडेअकराच्या सुमारास भरधाव वेगात जाणारी कार पलटी होऊन सिग्नलच्या खांबावर आदळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश कुंभार हा त्याचा मित्र सृजित जाधव याच्याकडून घेतलेली कार चालवत होता. त्यांचा सहप्रवासी तेजस गुरव याच्यासोबत हे दोघे बेलापूरहून वाशीकडे जात होते.

प्राप्त माहितीनुसार, सिद्धेश कुंभार टी एस चाणक्यच्या सिग्नलजवळ आले असता त्यांच्या समोरची कार अचानक थांबली. धडक टाळण्यासाठी सिद्धेशने अचानक ब्रेक लावल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडी पलटी होऊन सिग्नलच्या खांबाला धडकली. त्यामुळे भीषण अपघात झाला. (हेही वाचा -Mumbai Boat Accident: मुंबई बोट दुर्घटनेनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! बोटिंगचे नियम बदलले; पर्यटकांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन)

अपघातात एकाचा मृत्यू -

या अपघातात तेजस गुरव यांच्या डोक्याला, हाताला, छातीला गंभीर दुखापत झाली. प्रयत्न करूनही त्याच्या डोक्याला झालेल्या दुखापतीतून जास्त रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. कुंभार यांनाही गंभीर दुखापत झाली असली तरी सध्या त्यांची प्रकृती बरी आहे. NRI कोस्टल पोलिसांनी फिर्यादीच्या वक्तव्याच्या आधारे भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 (अ), 125 (ब), आणि 108 (1) नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. (हेही वाचा -Neelkamal Boat Accident in Mumbai: गेटवे जवळील बोट अपघात प्रकरणी नौदलाच्या स्पीड बोट ड्रायव्हरविरुद्ध FIR दाखल)

नवी मुंबईत रस्ता अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू -

ठाणे-बेलापूर रोडवर बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला या घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, नंतर त्याला काही लोकांनी पोलीस ठाण्यात आणले.