MLA Suresh Dhas vs Prajkata Mali | Instagram

बीड तालुक्यामध्ये सरपंच  संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खळबळ उडाल्यावर संताप व्यक्त करताना राजकीय चिखलफेकीत आमदार सुरेश धस( MLA Suresh Dhas) यांनी काही अभिनेत्रींची नावं घेतली होती. त्यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) देखील समावेश होता. प्राजक्तानेही सोशल मीडीया ट्रोलिंग नंतर थेट आमदाराकडून तिच्याबद्दल करण्यात आलेल्या टीपण्णीवर निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला होता. पत्रकार परिषद घेत प्राजक्ता माळीने समाजमाध्यमांवर तिच्या नावाने पसरवली जाणारी चूकीची माहिती, बातम्या याबद्दल भूमिका स्पष्ट करताना आमदार सुरेश धस यांच्याकडूनही माफीची मागणी केली होती. सुरेश धस यांनी काल (30 डिसेंबर) दिवशी माफी मागितल्यानंतर आता प्राजक्ताने महाराष्ट्राचे आभार मानत आता या प्रकरणाचा शेवट झाल्याचं जाहीर केलं आहे. नक्की वाचा: Suresh Dhas vs Prajakta Mali: प्राजक्ता माळी च्या पाठीशी मराठी कलाकार; पहा गौतमी पाटील ते मुग्धा रानडे यांची प्रतिक्रिया .

प्राजक्ता माळी विरूद्ध आमदार सुरेश धस प्रकरणाचा शेवट

प्राजक्ता माळी कडून सुरेश धस यांच्या वक्तव्यावरून महिलांचा, महिला कलाकारांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे ही भूमिका मांडण्यात आली होती. यावरून तिने महिला आयोगातही तक्रार दाखल केली होती. मात्र नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तिने कारवाईची विनंती केल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागितली आहे. आता प्राजक्तानेही त्या माफीचा स्वीकार करत धस यांचे आभार मानत 'तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे  पाईक असल्याचं दाखवून दिलं आहे.' असे म्हणत मानले आहेत. आता या प्रकरणामध्ये आपण कोणतीही कायदेशीर कारवाई करू इच्छित नाही असेही म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

प्राजक्ता माळीने महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अनेकांनी दर्शवलेल्या पाठिंब्याची तिने दखल घेत कलाकार आणि सर्व स्तरातील रसिकांचे आभार मानले आहेत.