Asha Bhosle On Gulabi Sadi INstagram

मेलेडी क्वीन आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या नावावर गाण्यांचे विक्रम आहेत. आज वयाच्या 91 व्या वर्षी देखील त्या स्टेजवर लाईव्ह गाताना ऐकून त्यांचे चाहते भारावतात. असाच एक अनुभव काही दिवसांपूर्वी दुबई (Dubai) मध्ये आला आहे. आशा भोसले यांनी दुबई मधील त्यांच्या लाईव्ह शो मध्ये अनेक ट्रेडिंग गाणी गायली. यामध्ये संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi Song) चा देखील समावेश आहे. संजूच्या 'गुलाबी साडी' गाण्याची भूरळ अनेकांना पडली. अनेक कार्यकमामध्ये ते वाजलं आहे. पण दुबईत स्टेज वर आशा भोसले यांच्या अंदाजातही हे गाणं ऐकण्याची दुर्मिळ संधी त्यांच्या चाहत्यांना मिळाली आहे. सध्या आशा भोसले यांच्या दुबईच्या लाईव्ह शो मधील क्लिप्स वायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा विकी कौशलच्या अंदाजातील 'तौबा तौबा' परफॉर्मन्स देखील तुफान वायरल झाला होता.

आशा भोसले 'गुलाबी साडी...' गातात तेव्हा

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejas V Kuwar (TJ) (@tejaskuwar786)

'गुलाबी साडी' गाताना त्या खास गुलाबी रंगाच्या साडीत होत्या. या गाण्याच्या काही हुक स्टेप्स देखील करत त्यांनी हे गाणं लाईव्ह परफॉर्म केले आहे. दरम्यान Gulabi Sadi हे गाणं 10 महिन्यांपूर्वी युट्युब वर लॉन्च करण्यात आलं आहे. या गाण्याला 300 मिलियन पेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. संजू राठोड हा या गाण्याचा मूळ गायक आहे. 2024 मधील ट्रेंडिंग गाण्यांपैकी हे एक गाणं होतं.

आशा भोसलेंचा 'तौबा ..' परफॉर्मन्स

आशा भोसलेंचा 'तौबा तौबा' गाण्यावरील स्वॅग पाहून रसिकांनी कौतुक केलेच आहे पण त्यासोबत बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने देखील सोशल मिडीयावर त्यांचा व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला होता.