Photo Credit- X

Jalgaon Violence: एका राजकीय व्यक्तीच्या वाहनाला पुढे जाऊ न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून मंगळवारी रात्री जळगावच्या (Jalgaon) पाळधी गावात मोठा वाद उफाळून (Violence Paladhi Village)आला. दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाळधी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर काही जणांनी तुफान दगडफेक (violent clash)करत भाजीपाला बाजाराजवळील पाच दुकानांची जाळपोळ केली.

जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात संचारबंदी लागू

पाळधी गावात मुख्य रस्त्यावर मंगळवारी रात्री राजकीय व्यक्तीच्या वाहनाला पुढे जाऊ न दिल्यामुळे वादाला सुरूवात झाली. वाद झाल्यानंतर प्रकरण तेथेच मिटले होते मात्र, रात्री अकराच्या सुमारास दोन गट ग्रामपंचायतीच्या चौकात पुन्हा वाद झाला. त्यानंतर झालेल्या हाणामारीला दंगलीचे स्वरूप आले. जमावाने मुख्य रस्त्यावर असलेल्या पाच दुकानांना आग लावली. त्यामुळे दुकानांमधील सर्व सामान जळून खाक झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले. आग विझविण्यात आली.