Happy New Year 2025 Celebrations: जपान, सिंगापूरमध्ये नवीन वर्षे 2025 चे उत्साहात स्वागत; फटाक्यांच्या आतषबाजीने उजळली शहरे

सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये नवीन वर्ष सुरू झाले आहे. टोकियोतील तोकुदाई-जी मंदिरात घंटा वाजवून लोकांनी नवीन वर्षाचे पारंपारिक शैलीत स्वागत केले.

Happy New Year 2025 Celebrations: जपान, सिंगापूरमध्ये नवीन वर्षे 2025 चे उत्साहात स्वागत; फटाक्यांच्या आतषबाजीने उजळली शहरे
Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतात लवकरच नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे. मात्र त्याआधी जगातील अनेक देशांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात झाली असून, मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन सुरु आहे. सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये नवीन वर्ष सुरू झाले आहे. टोकियोतील तोकुदाई-जी मंदिरात घंटा वाजवून लोकांनी नवीन वर्षाचे पारंपारिक शैलीत स्वागत केले. सिंगापूरमध्येही मोठ्या उत्साहात नवीन वर्ष साजरे केले जात आहे. दक्षिण कोरियामध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन साधे होते. याचे कारण म्हणजे 29 डिसेंबर रोजी झालेल्या विमान अपघातात देशातील 179 जणांचा मृत्यू झाला होता. सिडनी, मेलबर्न आणि ब्रिस्बेनख्या शहरांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने शहरे उजळून निघाली. (हेही वाचा: Happy New Year 2025: न्यूझिलंड मधील Auckland येथे Sky Tower वर फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं दणक्यात स्वागत)

Happy New Year 2025 Celebrations:

 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2024 10:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).