Happy New Year 2025 Messages 6 (फोटो सौजन्य - File Images)

Happy New Year 2025 Messages: दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री घड्याळात 12 वाजताच संपूर्ण जग जल्लोषात बुडून जाते.फटाके, गाणी आणि आनंदाच्या गजरात लोक नववर्षाचे स्वागत करतात. हा दिवस आपल्याला भूतकाळ मागे सोडून ऊर्जा आणि आशेने नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. हा दिवस प्रत्येकासाठी खास असतो. नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा ही केवळ आजची नाही, तर त्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. रोमन साम्राज्याने नवीन वर्ष 1 जानेवारीशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्युलियस सीझरने 46 बीसी मध्ये ज्युलियन कॅलेंडर सुरू केले. ज्यामध्ये त्यांनी 1 जानेवारी हे नवीन वर्ष म्हणजेच वर्षाचा पहिला दिवस म्हणून घोषित केले. ही तारीख निवडण्यामागचे मुख्य कारण 'जनुस' होते.

रोमन पौराणिक कथेनुसार, 'जॅनस' हा नवीन सुरुवात आणि प्रवेशाचा देव मानला जात असे. त्याच्या पुतळ्याला दोन चेहरे होते, एक भूतकाळाकडे आणि दुसरा भविष्याकडे. त्यांच्या नावावरून जानेवारी महिन्याचे नाव पडल्याचे मानले जाते. म्हणूनच 1 जानेवारी हा दिवस भूतकाळ सोडून भविष्याकडे पाहण्याचे प्रतीक मानले जात असे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोक एकमेकांना Images, Greetings, Quotes, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देतात. आम्ही तुमच्यासाठी नववर्षानिमित्त काही खास ग्रेटिंगज घेऊन आलो आहोत. ते तुम्ही सोशल मीडियाद्वारे शेअर करू शकता. (हेही वाचा - New Year 2025 Wishes: नवीन वर्षाच्या Quotes, WhatsApp Messages, Facebook Greetings च्या माध्यमातून पाठवा खास शुभेच्छा)

तुमच्या या मैत्रीची साथ

यापुढे ही अशीच कायम असू द्या..

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या..

येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा.

Happy New Year 2025 Messages 1 (फोटो सौजन्य - File Images)

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं,

नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत

नवीन वर्षाचं स्वागत करू,

आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा

पूर्ण होवोत या प्रार्थनेसह

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2025 Messages 2 (फोटो सौजन्य - File Images)

तुमच्या डोळ्यात जी स्वप्न सजलेली आहे तुमच्या हृ़द्यात ज्या इच्छा दडलेल्या आहे,

नववर्षात पूर्ण होवो या सा-या गोष्टी हेच आमचे देवाकडे मागणे आहे.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy New Year 2025

Happy New Year 2025 Messages 3 (फोटो सौजन्य - File Images)

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!

Happy New Year 2025

Happy New Year 2025 Messages 4 (फोटो सौजन्य - File Images)

गतवर्षीच्या फुलाच्या पाकळ्या वेचून घे.

बिजलेली आसवे झेलून घे.

सुख दुःख झोळीत साठवून घे.

आता उधळ हे सारे आकाशी.

नववर्षाचा आनंद भरभरून घे.

हैप्पी न्यू ईयर 2025

Happy New Year 2025 Messages 5 (फोटो सौजन्य - File Images)

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, एका वर्षात 365 दिवस असतात आणि दर 4 वर्षांनी लीप वर्ष येते. लीप वर्षात एक अतिरिक्त दिवस जोडला जातो, तो 366 दिवस बनतो. हा अतिरिक्त दिवस फेब्रुवारी महिन्यात जोडला जातो आणि दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिना 28 दिवसांऐवजी 29 दिवसांचा होतो. वास्तविक सूर्याला पृथ्वीभोवती फिरायला 365 दिवस आणि 6 तास लागतात. अशा स्थितीत, या 6-6 तासांचा कालावधी 4 वर्षांत 24 तासांनी जोडला जातो आणि 24 तासांचा पूर्ण दिवस असतो. त्यानंतरच एक सौर वर्ष पूर्ण होते आणि नवीन वर्ष सुरू होते.