Photo Credit- X

Brisbane Heat vs Melbourne Stars BBL 2024-25 Live Streaming: बिग बॅश लीग 2024-25 चा 19 वा सामना 1 जानेवारी रोजी ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना ब्रिस्बेन येथील द गाबा येथे खेळवला जाणार आहे. ब्रिस्बेन हीटने या स्पर्धेत आता चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोन जिंकले आहेत तर दोन पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुणतालिकेत ब्रिस्बेन हीट संघ 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, मेलबर्न स्टार्सने स्पर्धेत खराब कामगिरी केली आहे. मेलबर्न स्टार्सने स्पर्धेत पाच सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. मेलबर्न स्टार्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

सामना कधी खेळला जाईल?

बिग बॅश लीग 2024-25 मधील ब्रिस्बेन हीट विरुद्ध मेलबर्न स्टार्स यांच्यातील 19 वा सामना बुधवार, 1 जानेवारी रोजी ऍडलेड ओव्हल, ऍडलेड येथे भारतीय वेळेनुसार, दुपारी 1:45 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल.

सामना कुठे पाहायचा?

बिग बॅश लीग 2024-25 मधील ब्रिस्बेन हीट विरुद्ध मेलबर्न स्टार्स यांच्यातील 19 वा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, तुम्ही Disney+ Hotstar ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

दोन्ही संघांचे खेळाडू

ब्रिस्बेन हीट संघ: टॉम बँटन (विकेटकीपर), कॉलिन मुनरो (कर्णधार), नॅथन मॅकस्विनी, मॅट रेनशॉ, मॅक्स ब्रायंट, पॉल वॉल्टर, झेवियर बार्टलेट, मिचेल स्वीपसन, स्पेन्सर जॉन्सन, मॅथ्यू कुह्नेमन, डॅनियल ड्रू, मायकेल नेसर, विल प्रेस्टीज, जॅक वाइल्डरमथ

मेलबर्न स्टार्स संघ: सॅम हार्पर (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस (कर्णधार), बेन डकेट, ग्लेन मॅक्सवेल, हिल्टन कार्टराईट, जोनाथन मर्लो, उसामा मीर, जोएल पॅरिस, ब्रॉडी काउच, पीटर सिडल, थॉमस फ्रेझर रॉजर्स, कॅम्पबेल केलवे, मार्क स्टेकीटी , डॅनियल लॉरेन्स