Delhi Suicide Case: दिल्लीतील लोकप्रिय वुडबॉक्स कॅफेचे (Woodbox Cafe) सह-संस्थापक पुनीत खुराना (Puneet Khurana) मंगळवारी (31 डिसेंबर 2024) संध्याकाळी त्यांच्या कल्याण विहार, मॉडेल टाऊन येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांना त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक संशय आहे. खुराना यांचा त्यांची पत्नी मनिका जगदीश पाहवा यांच्यासोबत वाद होता आणि ते घटस्फोट (Divorce) घेण्याची प्रक्रिया पार पाडत होते. कॅफेमध्ये व्यावसायिक भागीदार असलेले दोन्ही सह-मालक विभाक्त होण्याच्या काळात परस्परांसाठी संघर्षाचा मद्दा ठरले होते, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
कुटुंबचा जबाब आणि पोलिसांची माहिती
पुनीत खुराना यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ते आपल्या पत्नीवर वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींवरून नाराज होते. या जोडप्याचे 2016 मध्ये लग्न झाले होते. परंतू पुढच्या काहीच वर्षांमध्ये त्यांच्यात मतभेद होऊ लागले आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. ज्यातून त्यांच्यातील संघर्ष काहीसा अधिकच तीव्र झाला. पोलिसांनी खुराणा यांचा मोबाईल तपासासाठी जप्त केला असून, पाहवा यांना चौकशीसाठी बोलावले आहे. प्रसारमाध्यमांद्वारे आणि सोशल मीडियामध्ये प्रसार झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये, व्यवसायाच्या थकबाकीबाबत जोडप्यामध्ये जोरदार वाद झाला होता, अशी माहिती आहे. (हेही वाचा, Bengaluru Techie Suicide Case: बेंगलूरू मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या; पोलिसांनी दाखल केला कुटुंबातील 5 जणांविरूद्ध FIR)
ऑडिओ रेकॉर्डींगमध्ये व्यावसायिक संघर्षाची पुष्टी
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या 16 मिनीटांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये खुराना यांच्या पत्नीला अधोरेखीत करण्यात आले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, 'आम्ही विभक्त होत आहोत. परंतू, मी अद्यापही व्यवसायिक भागीदार आहे.. त्यामुळे तुम्हाला माझी देय रक्कम द्यावीच लागेल.' हे रेकॉर्डींग व्यवसाय आणि मालमत्तेच्या विभाजनावरुन दोघांमध्ये असलेला तणाव स्पष्ट दर्शवतो आहे. (हेही वाचा, Bengaluru Techie's Suicide Case: बंगळुरू अभियंता आत्महत्या प्रकरणाबाबत Kangana Ranaut चे वादग्रस्त विधान; म्हणाली- '99% लग्नांमध्ये पुरुषांचीच चूक' (Video))
बंगळुरु येथील घटनेची पुनरावृत्ती?
दरम्यान, ही घटना डिसेंबरमध्ये बंगळुरु येथे घडलेल्या तंत्रज्ञ अतुल सुभाष यांच्या आत्महत्येशी संमांतर असल्याचा दावा केला जात आहे. ज्यामध्ये पत्नी आणि कुटुंबीयांच्या कथीत छळानंतर सुभाष यांनी आत्महत्या केली. आपल्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटना आणि छळांची माहिती देणारे आरोप करत सुभाष यांंनी तब्बल 24 पानांची चिठ्ठी आत्महत्येपूर्वी (सुसाईड नोट) लिहीली आहे. या घटनेनंतर सुभाष यांची पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांना अटक करण्यात आली.
कोणत्याही व्यक्तीस होत असलेला मानसिक त्रास, छळ यांबाबत तक्रार करता येते, मदत मिळवता येते. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची काहीही गरज नसते. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीबाबत तुम्हास माहिती मिळाली असल्यास, किंवा इतर कोणतीही मदत आवश्यक असल्यास आपण पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच, ई-मेलही पाठवू शकता. वांद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ: 9999666555 किंवा help@vandrevalafoundation.com या ईमेल आयडीवर संपर्क साधा किंवा TISS iCall: 022-25521111 (सोमवार-शनिवार उपलब्ध: सकाळी 8 ते रात्री 10) संपर्क साधून मतत मिळवता येते.