Classroom comedy turns into tragedy: पश्चिम दिल्लीतील जनकपुरी येथे एका शाळेत सोमवारी एका 16 वर्षीय मुलावर त्याच्या शाळकरी मित्राने चाकू हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्गात शिक्षक नसताना विद्यार्थ्यांमध्ये गप्पा सुरु होत्या. नंतर ते एकमेकांवर विनोद करू लागले. त्याच्यात वादाला सुरुवात झाली. त्यानंतर शाब्दिक शिवीगाळ आणि नंतर हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. हाणामारीदरम्यान, आरोपी, दहावीत शिकणाऱ्या मुलाने चाकू काढला आणि बारावीच्या विद्यार्थ्यावर वार केले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा:Lucknow: पेशंटच्या मृत्यूमुळे रुग्णालयात डॉक्टरला बेदम मारहाण; सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येताच पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन (Watch Video) )
पीडित मुलाला वाचवण्यासाठी तेथे उपस्थितांनी त्वरीत हस्तक्षेप केला आणि त्याला शाळेच्या वैद्यकीय कक्षात नेले. मुलाची गंभीर स्थिती पाहून, वैद्यकीय उपचारानंतर प्रभारी शिक्षकाने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले. दरम्यान दिल्लीत शाळेत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
दक्षिण दिल्लीतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी तिच्या शिक्षकाने मंगळवारी तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी त्याबाबतची माहिती दिली. मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की, शिक्षक त्याच्या घरी शिकवणीसाठी बोलवायचा. त्यांनी सांगितले की, त्यांची मोठी मुलगीही तिथेच शिकत होती. "एक टीम शाळेत पाठवली गेली, जिथे समुपदेशकाने सांगितले की, विद्यार्थिनीच्या शिकवणीच्या शिक्षकाने तिला अनुचितपणे स्पर्श केला," मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की, तिच्या मुलीची तिच्यासमोर चौकशी केली गेली आणि कोणताही पुरावा कोणत्याही प्रकारचा विनयभंग किंवा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला नाही. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.