Mumbai: रात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी  प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील मोठ्या घड्यालीत 12 वाजल्यानंतर मुंबईतील प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या सर्व लोकल गाड्या 2025 च्या आगमनाचे स्वागत आणि अभिवादन करत हॉर्न वाजवत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भारतीय रेल्वेने अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर नवीन वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा एका महत्त्वपूर्ण आहे, लोक मध्यरात्री प्रवास करतात आणि लोक स्थानकावर नवीन वर्षाचे स्वागत करतात.  या सुंदर क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्लॅटफॉर्म, फूटब्रिज आणि जवळपासच्या भागातील प्रवासीआणि रेल्वे कर्मचारी एकत्र आले होते. हे देखील वाचा: First Sunrise of 2025 Videos: कोचीपासून पुरी आणि चेन्नईपर्यंत, भारतातील वेगवेगळ्या राज्यातील पहिल्या सूर्योदयाची दृश्ये

येथे पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)