Image For Representation (Photo Credits: PIB)

Guidelines For Private Hospital: मुंबईत वाढत्या ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयासाठी नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. त्यानुसार खासगी रुग्णालयांना असे सांगण्यात आले आहे की, दुसऱ्या लाटेवेळी अॅक्टिव्ह कोविड बेड पुन्हा वापरण्यात येणार आहेत. मुंबईत परिस्थिती बिघडत चालली आहे. तर लक्षणे नसलेल्या रूग्णांना कॉमोरबिड असल्यास त्यांना रूग्णालयात दाखल करावे आणि जर ते आधीच दाखल असतील आणि बेडची कमतरता असेल तर त्यांची स्थिती पाहून त्यांना 3 दिवसांच्या आत डिस्चार्ज दिला जाईल.

त्याचसोबत मुंबईतील झोपडपट्टी पेक्षा इमारतीतल कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यासाठी महापालिकने बिल्डिंग सील करण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे. तर जाणून घ्या खासगी रुग्णालयासाठीच्या नव्या गाइडलाइन्सबद्दल अधिक.(Rajesh Tope on Coronavirus and Mumbai Local: जिल्हाबंदी अथवा मुंबई लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही- राजेश टोपे)

>>बीएमसीने म्हटले आहे की रुग्णालयाने 80 टक्के कोविड बेड आणि 100 आयसीयू बेडसह वॉर्ड वॉर रूम उघडाव्यात.

>>या वॉर्ड रूम आरक्षित असतील आणि बीएमसीच्या परवानगीशिवाय येथे प्रवेश दिला जाणार नाही.

सर्व खासगी रुग्णालये रुग्णांकडून सरकारने ठरवून दिलेले दरच आकारतील.

>>आता सर्व खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णाला दाखल करण्यापूर्वी बीएमसीची परवानगी घ्यावी लागणार आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार बीएमसीने इमारत सील करण्याच्या प्रोटोकॉलमध्ये बदल केला आहे. त्यानुसार एखाद्या इमारतीच्या विंग, कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीच्या २० टक्के फ्लॅटमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाईल. रुग्ण आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. कोरोना रुग्णाला १० दिवस वेगळे राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.