पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता
President's Rule In Maharashtra | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा देणारा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दूरदर्शन या सरकारी वृत्तवाहिनीच्या हवाल्याने दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात होणाऱ्या चर्चेबाबतचा तपशील समजला नसला तरी, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President's Rule In Maharashtra)  लागू करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यात वर्तवली जात आहे. उल्लेखनिय असे की, ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) ब्राझीलला रवाना होणार आहे. तत्पूर्वी ही बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे तसेच, भुवयाही उंचावल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रपती भवनाकडून मात्र राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत कोणतीही शिफारस करण्यात आल्याच्या वृत्ताचे खंडण करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये मिळालेल्या जनादेशाचा विचार करता भाजप-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. शिवसेना-भाजप युतीकडे बहुमतासाठी आवश्यक असणारा 145 हा आकडाही आहे. असे असले तरी, शिवसेना-भाजप यांच्यात सत्तेचे समसमान वाटप आणि मुख्यमंत्री पद यावरुन सत्तासंघर्ष निर्माण झाला. त्यामुळे युती सरकार अस्तित्वत येऊ शकले नाही.

एएनआय ट्विट

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला पाचाराण केले. मात्र, भाजप बहुमताचा आकडा गाठू शकला नाही. त्यानंतर क्रमांक दोनचा पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाला राज्यपालांनी पाचारण केले. मात्र, आपल्याला बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही, असे सांगत शिवसेनेनेही बहुमत सिद्ध करण्यास अयशस्वी ठरली. त्यानंतर आता राज्यपालंनी क्रमांक तिनचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी पाचारण केले आहे. (हेही वाचा, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेचा दावा करणार का?)

एएनआय ट्विट

विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल लागला. या निकालात भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले.