Gold Silver Price | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Gold-Silver Price Updates: देशात पेट्रोल, डिझेल तर आणि सोने चांदी दर (Gold-Silver Price) यांबाबत सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेहमीच उत्सुकता, काळजी आणि काही प्रमाणात भीतीही असते. इंधन आणि सोने-चांदी दर (Gold Silver Today's Rate) या दोन्हींच्याही दरांमध्ये मोठी अनिश्चितता असते. कोणत्या दिवशी वाढतील आणि काही प्रमाणात घसरतील याचा नेम नसतो. सोने, चांदी दराबाबत विचार सांगायचे तर प्रदीर्घ काळ स्थिर असलेल्या सोने चांदी दरात गेल्या काही काळापासून अचानक हालचाल होताना दिसत आहे. सोने दर वाढले आहेत तर दुसऱ्या बाजूला चांदीनेही सोन्याचीच री ओढल्याचे पाहायला मिळते आहे. चांदीतही काही प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. जाणून घ्या सोने, चांदीचे आजचे दर.

गोल्ड रिटर्न्स (Good Returns) नावाच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, आज 24 कॅरेट सोन्याची प्रति एक ग्रॅमची किंमत 4,759 इतकी आहे. 8 ग्रॅम सोन्याची किंमत 38, 072 तर प्रति एक तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,590 रुपये इतकी आहे. जर तुम्ही 100 ग्रॅम म्हणजेच 10 तोळे सोने घ्याल तर त्याची किंमत 4,75,900 रुपये इतकी आहे. दरम्यान, 22 कॅरेटचे सोन्याचा प्रती 10 ग्रॅम दर 46,590 इतका आहे. (हेही वाचा, Petrol-Diesel Price Today: मुंबई शहरात पेट्रोल दराचे शतक; डिझेलही Century ठोकण्याच्या तयारीत; पाहा आजचा Score)

विविध शहरांतील 22 कॅरेट सोन्याची किंमत (प्रती 10 ग्रॅम)

  • मुंबई - 46600 रुपये
  • दिल्ली - 46770 रुपये
  • बंगळुरू - 45820 रुपये
  • चंदीगढ- 46770 रुपये
  • कोलकाता - 48180 रुपये
  • नाशिक- 46,600 रुपये

विविध शहरांतील 24 कॅरेट सोन्याची किंमत (प्रती 10 ग्रॅम)

  • दिल्ली- 50,760 रुपये
  • मुंबई- 47,590 रुपये
  • कोलकाता- 50,750 रुपए
  • चेन्नई- 50,310

दरम्यान, चांदी दराबाबत सांगायचे तर आज (31 मे 2021) रोजी चांदी 71,600 रुपए प्रति किलो दराने विकली जात आहे. दिल्लीमध्ये चांदी प्रति किलो 71,600 रुपए प्रति किलो विकली जात आहे. तर मुंबई आणि कोलकाता शहरात चांदी एकाच दराने (71,600 रुपए प्रति किलो) विकली जात आहे. चेन्नई शहरात चांदी प्रति किलो 76,200 रुपए भावाने विकली जात आहे.