Fuel Price Hike India | (File Image)

देशातील पेट्रोल, झिलेल दरांनी (Petrol-Diesel Price Today) पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांवर महागाईच्या कुऱ्हाडीचे घाव पुन्हा एकदा अधिक प्रमाणावर पडू लागले आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकातासह देशभरातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये इंधन दर शंभरीत पार आगोदरच गेले आहेत. त्यात आज (31 मे 2021) पुन्हा एकदा या दरांनी उसळी घेतल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा आर्धिक बोजा पडला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल 29 पैसे प्रतिलीटकर तर डिझेल 26 पैसे प्रतिलीटर या दराने महागले आहे. दिल्ली शहरात पेट्रोल, डिझेल अनुक्रमे प्रतिलीटर 94.3 रुपये आणि 85.15 रुपये, तर मुंबई शहरात 100.47 रुपये आणि 92.45 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल डिझेल दर (Petrol and Diesel Rate).

देशातील प्रमुख शहरांतील इंधन दर (प्रतिलीटर प्रमाणे)

दिल्ली

  • पेट्रोल- 94.23 रुपये
  • डिझेल- 85.15 रुपये

मुंबई

  • पेट्रोल- 100.47 रुपये
  • डिझेल- 92.45 रुपये

चेन्नई

  • पेट्रोल- 95.76 रुपये
  • डिझेल- 89.90 रुपये

कोलकाता

  • पेट्रोल- 94.25 रुपये
  • डिझेल- 87.74 रुपये

गेल्या काही दिवसांचा इतिहास पाहता बाजारात पेट्रोल डिझेलच्या किमती एक दिवसआड या प्रमाणात वाढताना दिसत आहत. दरम्यान, काल (रविवार, 30 मे) देशातील इंधन दरात कोणत्याही प्रकारची विशेष वाढ अथवा कपात करण्यात आली नव्हती. इंधन दर हे स्थिर होते. दरम्यान, मे महिन्यात आतापर्यंत 13 वेळा इंधन दरवाढ करण्यात आली. आजच्या दरवाढ ही 14वी आहे. म्हणजेच मे महिन्यात एकूण 14 वेळा इंधन दर वाढ झाली आहे. (हेही वाचा, टोल प्लाझावर 10 सेकंदाहून अधिक वेळ वाट पहावी लागल्यास Toll Tax वसूल केला जाणार नाही)

दरम्यान, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये काही शहरांमध्ये इंधन दरवाढ ही प्रतिलीटर 100 रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. मुंबई, जयपूर, गंगानगर आणि भोपाळ आदी शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 100 रुपये यांपेक्षाही अधिक दराने विकले जात आहे.