दिवाळी (Diwali) हा सण देशभर मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा केला जातो. कोरोना संकट दूर सारून आता पुन्हा दिवाळी धूम धडाक्यात साजरी करण्यासाठी लोकं सज्ज झाली आहे. नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) च्या दिवशी आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) देखील केले जाणार आहे. या सणाच्या निमित्ताने मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. प्रामुख्याने या दिवशी अनेकांचा सोनं खरेदी करण्याकडे कल असतो. आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत तुम्ही देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पहा आजचा सोन्याचा आणि चांदीचा दर काय आहे? हेही वाचा Lakshmi Pujan 2022 Wishes: लक्ष्मी पूजनानिमित्त WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes द्वारा द्या मंगलमय शुभेच्छा!
सोन्या-चांदीचा दर काय?
goodreturns.com च्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम साठी 47,010 रूपये आणि 24 कॅरेट साठी दर हा 51,290 रूपये आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 57,700 रूपये आहे. सोन्याचे दागिने हे प्रामुख्याने 22 कॅरेट मध्ये बनवले जातात. तर सोन्याच्या गुंतवणूकीमध्ये तुम्ही विचारात असाल तर त्यासाठी सोन्याची वळी, बिस्किट, कॉईन हे 24 कॅरेट मध्ये घेऊ शकता. 24 कॅरेट सोनं हे शुद्ध सोनं म्हणून समजलं जातं.
दरम्यान सोन्याचा दर हा प्रत्येक राज्यात आणि सराफा दुकानात थोडा वर-खाली असू शकतो. सोन्याच्या दरावर जीएसटी आणि अन्य कर, दागिने केल्यास घडणावळ देखील मोजावी लागते.
लक्ष्मी पूजनाचा दिवस हा घरातील धन संपत्तीचं, सोन्या, चांदीच्या वस्तूंचे पूजन करण्याचा आहे. या निमित्ताने लक्ष्मीचं पूजन करून, लाह्या-साखरेचा नैवेद्य दाखवून हा सण साजरा केला जातो.