Jewellery (Photo Credits: Pixabay)

सोने (Gold ) खरेदीचा विचार करता आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पाठिमागील काही दिवसांपासून सोने दर (Gold Price) सातत्याने कमी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज (बुधवार, 4 ऑगस्ट 2021) सुद्धा सोन्याची मागणी फारशी नसल्याचे सोने दरात घट झाल्याचे पाहायला मिळते आहे. वायदे बाजार घडामोडी आणि केंद्र सरकारने सोन्यासंबंधी घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय यामुळे सोने दरात चढ-उतार पाहयला मिळत आहेत. प्रामुख्याने सोने दरात वाढ होण्याऐवजी एकदर दर (Gold Rate in Maharashtra ) स्थिर राहात आहेत किंवा थोड्याफार प्रमाणात घटत आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) सोने वायदे दर प्रति 10 ग्रॅम म्हणजेच प्रति तोळा 47,935 रुपये पाहायला मिळत आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीचा विचार करायचा तर चांदी दरात काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. चांदी 0.34% ने वाढून ₹68145 प्रति किलो झाली आहे.

सोने बाजाराचे अभ्यास सांगतात की, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने दर स्थिर आहेत. स्पॉट गोल्ड प्रति औंस 1,809.21 डॉलर तर, चांदी प्रति औंस 25.50 डॉलर दराने विकली जात आहे. चांदी दरात 0.2% घट झाल्याचे पाहायला मिळते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. गेल्या वरषी सेने विक्रमी दराने विकले गेले. त्यात जवळपास 8200 रुपयांची घट पाहायला मिळत आहे. मात्र, सोने बाजारातील हे दर लवकरच बदलले जातील. त्यात वाढ होऊन सोने लवकरच प्रति तोळा 48,500 रुपयांवर पोहोचू शकते. (हेही वाचा, World's Most Expensive Ice Cream: दुबईमध्ये विकले जात आहे जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम; होत आहे 23 कॅरेट सोन्याचा वापर, जाणून घ्या किंमत (Watch Video))

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोने चांदी दर

  • मुंबई सराफा बाजार- 46960 रुपये प्रतितोळा
  • पुणे सराफा बाजार- 46,230 रुपये प्रतितोळा
  • नागपूर सराफा बाजार- 46960 रुपये प्रतितोळा
  • नाशिक सराफा बाजार- 46,230 रुपये प्रतितोळा

भारतीय नागरिक आणि सोने यांचे जुनेच नाते आहे. सण, समारंभ, उत्सव अशा वेळी एकमेकांना सोने भेट देण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. लग्नसराई ही तर भारतातील सोने खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ. विवाह समारंभात मोठ्या प्रमाणावर सोने भेट दिले जाते. वर, वधूसोबतच कुटुंबातील लोकही सोने खरेदी करतात.