World's Most Expensive Ice Cream: दुबईमध्ये विकले जात आहे जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम; होत आहे 23 कॅरेट सोन्याचा वापर, जाणून घ्या किंमत (Watch Video)
World's Most Expensive Ice Cream (संग्रहित संपादित प्रतिमा)

आईस्क्रीम (Ice Cream) ही गोष्ट आवडत नाही असे म्हणणारी व्यक्ती क्वचित एखादी असू शकते. जगात विविध गोष्टींपासून अनेक प्रकारचे आईस्क्रीम बनवले जातात. जगात अनेक कंपन्या आहेत ज्यांची आईस्क्रीम्स फारच महाग आहेत. मात्र जर का तुम्हाला कोणी सांगितले की, जगात असेही एक आईस्क्रीम विकले जाते ज्याची किंमत एक तोळा सोन्यापेक्षाही जास्त आहे, तर आपला विश्वास बसेल? नाही ना? मात्र हो अहवालानुसार दुबईतील (Dubai) स्कूपी कॅफेमध्ये ‘ब्लॅक डायमंड’ (Black Diamond) नावाचे आईस्क्रीम विकले जात आहे, ज्याची किंमत 840 डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 62,900 रुपये आहे.

आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे आइस्क्रीम आहेत. पण सध्या एक आईस्क्रीम त्याच्या किंमतीमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या आइस्क्रीमचा स्वाद घेण्यासाठी आपल्याला हजारोंच्या घरात रक्कम खर्च करावी लागेल. ट्रॅव्हल ब्लॉगर शहनाज ट्रेझरीने अलीकडेच तिच्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ तिच्या दुबईच्या प्रवासाचा आहे. यात तिने दुबईमध्ये विकले जाणारे जगातील सर्वात महागड्या आईस्क्रीमविषयी सांगितले आहे.

या आइस्क्रीममध्ये घातले गेलेले घटक हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. हे आईस्क्रीम ताज्या व्हॅनिला बीन्सपासून बनविलेले जाते. याशिवाय यामध्ये उच्च प्रतीचे केशर आणि ब्लॅक ट्रफल देखील मिक्स केले जाते. आईस्क्रीमच्या घटकांमध्ये इटालियन ट्रफल्स, एम्ब्रोसियल इराणी केशर आणि खाण्याजोगे 23-कॅरेट सोन्याचे फ्लेक्स आहेत. हे आपल्या डोळ्यांसमोर बनवले जाते. हे आइस्क्रीम सर्व्ह करताना त्याचे गार्निशिंग 23 कॅरेट सोन्याने केले जाते. (हेही वाचा: Cadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा)

हे ब्लॅक डायमंड आईस्क्रीम लोकांना एका स्पेशल कपमध्ये दिले जाते. या आइस्क्रीमला काळ्या आणि सोन्याच्या रंगाच्या एका खास Versace Bowl मध्ये सर्व्ह केले जाते. दुबईमध्ये जिथे हे आईस्क्रीम उपलब्ध आहे त्याच ठिकाणी 23 कॅरेट खाण्याजोग्या सोन्यापासून बनविलेले लॅट कॉफी देखील दिली जाते. इथले लोक याला ‘गोल्ड कॉफी’च्या नावानेही ओळखतात.