Cadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा
Representational Image (Photo Credits: Pixabay)

कॅडबरीच्या (Cadbury) प्रोडक्ट्स मध्ये बीफ (Beef) चा वापर असतो अशा प्रकारचे मेसेज सध्या सोशल मीडीयात वायरल होत असताना आणि यावर बंदीची मागणी होत असताना नुकतेच कंपनीकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ब्रिटिश एमएमसी कडून आज यावर स्प्ष्टीकरण देताना Mondelez या भारतात कॅडबरीचं उत्पादन करणार्‍या कंपनीकडून सोशल मीडीयात वायरल होणारे मेसेजेस हे भारतीय उत्पादनाशी निगडीत नसल्याचं म्हटलं आहे. सोबतच त्यांनी भारतात तयार होणारी आणि विकली जाणारी सारी कॅडबरीची प्रोडक्ट्स ही 100% शाकाहरी असल्याचं म्हटलं आहे. कॅडबरीच्या रॅपर्सवर त्याची माहिती देण्यासाठी हिरवा डॉट देखील छापला जात असल्याचं म्हटलं आहे.

कॅडबरी डेअरी मिल्क कडून करण्यात आलेल्या ट्वीट मध्ये ' आमच्या आवडत्या ब्रॅडच्या विविध उत्पादनांना अशा खोट्या वृत्तामुळे, चूकीच्या दाव्यामुळे फटका असू शकतो. याची तुम्हांला कल्पना आहे. त्यामुळे त्याबद्दलची माहिती पुढे शेअर करण्यापूर्वी तुम्ही सत्यता तपासून पहा' असे आवाहन करण्यात आले आहे. नक्की वाचा: बीफ विकल्याच्या संशयावरून 68 वर्षीय व्यक्तीला जमावाकडून मारहाण; जबरदस्तीने डुकराचे मांस खायला लावले (Video).

Cadbury Dairy Milk चं ट्वीट

कॅडबरीची ही Beef Controversy सध्या सोशल मीडीयामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. यामध्ये जिलेटीन असलेल्या पदार्थांमध्ये ते बीफ़ मधून घेतलेले असल्याची माहिती देणारे स्क्रिनशॉट्स वायरल झाले आहेत. दरम्यान कंपनीने हे वायरल झालेले मेसेज भारतीय उत्पादनाशी निगडीत नसल्याचं म्हटलं आहे.

वायरल स्क्रीन शॉर्ट

कॅडबरी ही ब्रिटीश मल्टीनॅशनल कंपनी आहे. Mondelez International कडे त्याची मालकी आहे. भारतामध्येही ती प्रसिद्ध आहे. John Cadbury यांनी 1831 साली त्याची पहिली स्थापना केली होती.