Pune Crime: पुण्यात तरुणीची हत्या, तीन मित्रांना अटक; अपहरण करून मागितली होती खंडणी
Representational image (Photo Credit- IANS)

Pune Crime: पुण्यात नेमकं चाललं तरी काय? गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्जबाजारी तरुणाने मैत्रिणीसोबत असं काही केलं ज्यामुळे शहर हादरलं आहे. तरुणाने खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण केले आहे. त्यानंतर त्याने तरुणीची हत्या केली. या सर्व घटनेनंतर त्यांने तरुणीचा मृतदेह एका शेतात जाळला आणि जमिनीत पुरला. (हेही वाचा-अंधेरीत धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गरोदर राहिल्याने प्रकरण उघडकीस

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री सुडे असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव होते. ती 22 वर्षाची होती.भाग्यश्रीचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या मित्रांना अटक केले. आरोपींनी तीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे तरुणीचा मृतदेह जाळून टाकला आणि त्यानंतर त्यांनी जमिनीत पुरला अशी माहिती पोलिासांच्या हाती लागली आहे.

भाग्यश्री सुडे ही लातूर जिल्हायातील रहिवासी आहे. ती शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती. शहरातील वाघोली परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. 30 मार्च पासून भाग्यश्री बेपत्ता होती त्यामुळे तीच्या आईवडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. ती 30 मार्चला संध्याकाळी फिनिक्स मॉलमध्ये फिरत होती. त्यावेळी तिचे मित्र भेटले होते. तीचा फोन देखील बंद होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु  केल्यानंतर तिघां मित्रांना ताब्यात घेतले.

आई वडिलांकडे एक मेसेज आला त्या मेसेजमध्ये असं लिहलं आहे की, तुमची मुलगी आमच्या ताब्यात असून नऊ लाख रुपये द्यावे लागतील" असं लिहिलेलं होतं. ज्या नंबरवरून मेसेज आला होता त्या नंबरला पोलिसांनी ट्रेस केला. पोलिसांनी या प्रकरणी शिवम, सागर आणि सुरेश या तिघांना अटक केले आहे.