कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात अनेकांना आर्थिक संकटाच्या समारे जावे लागत आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी अनेक राजकीय नेते, कलाकार धावून आले आहेत. यातच पुणे (Pune) येथील एका रिक्षाचालकाच्या (Autorickshaw Driver) समाजसेवेने सर्वांचेचे लक्ष वेधून घेतले आहे. संबंधित रिक्षाचालकाने चक्क लग्नासाठी साठवलेल्या पैसे स्थलांतरित कामगारांची मदतीसाठी वापरले आहेत. या कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संबंधित रिक्षाचालकाचे कौतूक केले जात आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुण्यात आढळून आले आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.
अक्षय कोथावले असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे. अक्षयने या उन्ह्याळ्यात लग्न करायचे ठरवले होते. यासाठी त्याने 2 लाख रुपये देखील जमा केले होते. मात्र, देशात लॉकडाउन असल्यामुळे त्याला लग्न पुढे ढकलावे लागले. त्यानंतर 4 मेनंतर लॉकडाऊन उघडल्यावर आपण लग्न करू, असे त्याने ठरवले होते. परंतु, पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने त्याने लग्नासाठी जमा केलेल्या पैशातून स्थलांतरित मजुरांची मदत करायला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पैशातून दररोज 400 स्थलांतरित मजुरांसाठी अन्न तयार करण्यासाठी केला जात आहे. एवढेच नव्हेतर, तो आपल्या रिक्षातून जेष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांनी मोफत रुग्णालयात घेऊन जाण्याची ऑफर दिली आहे. तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घ्यावी, यासाठी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून जनजागृती देखील करत आहे. अक्षयच्या या कामगिरीचे संपूर्ण महाराष्ट्र मनापासून कौतूक करत आहे. हे देखील वाचा- पुणे: तुळशीबाग आणि महात्मा फुले मंडई 5 जूनपासून सुरु
पीटीआयचे ट्वीट-
Funds pour in for #Pune-based autorickshaw driver who used wedding savings to feed migrant workers amid #lockdown; the monetary help is being used to provide food, ration kits to the poor
— Press Trust of India (@PTI_News) June 2, 2020
कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूनवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 8 हजारांचा वर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 338 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 हजारांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे.