
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Case) छडा लावण्यास मुंबई पोलिस असमर्थ ठरत असल्याची टिका अनेकांकडून होत आहे. यात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील पोलिसांवर टिका करत काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. या वक्तव्याचा निषेध करत माजी पोलीस अधिकारी ऍड . विश्वास काश्यप (Vishwas Kashyap) यांनी अमृता फडणवीस यांना फेसबुकच्या माध्यमातून एक खुलं पत्र लिहिले आहे. 'बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या' असे या पत्रात म्हटले आहे.
आपण माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती आहात म्हणून इतके दिवस तुमचा मानसन्मान ठेवला . परंतु ज्या पोलिसांच्या जीवावर तुम्ही दिवसरात्र जीवाची मुंबई करता आणि त्यांनाच नावे ठेवता , त्यावेळी तुमचा मानसन्मान की काय तो ठेवावा की नाही याचा विचार करावा लागतो, असं या पत्रात म्हटले आहे. Sushant Singh Rajput Death: रिया चक्रवर्ती च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; अनिल देशमुख यांंनी दिली 'ही' प्रतिक्रिया
*अमृताबाई फडणवीस ,* *पोलिसांविषयी जरा सबुरीने घ्या ....*सौ . अमृताबाई फडणवीस ,
पत्नी माजी मुख्यमंत्री,
महाराष्ट्र...
Posted by Vishwas Kashyap on Friday, August 7, 2020
बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या . मागेपुढे पोलीस तुमच्या संरक्षणाला आहेत . याचे भान ठेवा . फुकटच्या संरक्षणात फिरून सुद्धा ही भाषा . बरं नव्ह असलं वागणं .
अमृता फडणवीस यांचे ट्विट:
The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled - I feel #Mumbai has lost humanity & is no more safe to live - for innocent, self respecting citizens #JusticeforSushantSingRajput #JusticeForDishaSalian
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 3, 2020
बाईसाहेब , एक नम्र विनंती . यापुढे एकही वाकडी तिकडी कॉमेंट पोलिसांविषयी टाकू नका . ज्या क्षेत्रातले आपल्याला काही कळत नाही त्यावर आपण कशाला बोलायचे ? आपले सामाजिक योगदान किती ? ऑर्केस्ट्रामध्ये एक दोन गाणी म्हटल्याने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपण काहीही बोलू शकतो हा सल्ला आपल्याला दिला कोणी ?? जरा सांभाळून बाईसाहेब असा सल्लाही काश्यप यांनी या पत्रातून दिला आहे.
“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.