सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यु प्रकरणात पाटणा पोलिसांकडुन तपासाची कारवाई मुंंबई पोलिसांंकडे सोपावण्यात यावी यासाठी सुशांंतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakrobarty) हिने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. येत्या 11 ऑगस्ट रोजी या याचिकेवर सुप्रिम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना ANI ला सांंगितले की, मुंंबई पोलिस (Mumbai Police) या प्रकरणात अत्यंत प्रोफेशनली तपास करत आहेत सध्या सुप्रिम कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल जर का हा खटला सीबीआय कडे देण्याबाबत निर्णय झाला तर त्यानुसार तात्काळ कारवाई होईल. त्यामुळे या एकुण प्रकरणात आता पुढे काय हे पाहण्यासाठी सुशांतच्या चाहत्यांना 11 तारखेची वाट पाहावी लागणार आहे.
दुसरीकडे, शुक्रवारी (7 ऑगस्ट) ला या संदर्भात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी तिला सुशांतच्या अकाउंट मधुन काढण्यात आलेल्या रक्कमेबाबत विचारणा करण्यात आल्याचे माध्यमातील सुत्रानुसार समजत आहे. (Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीचे Call Details झाले उघड)
ANI ट्विट
We will abide by Supreme Court decision. Mumbai Police is investigating the case very professionally: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on being asked if Mumbai Police will hand over the #SushantSinghRajput case probe to CBI or there will be a parallel investigation pic.twitter.com/ITo2l7pQXo
— ANI (@ANI) August 8, 2020
दरम्यान सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. गेल्या एका वर्षात रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूतला केवळ 142 वेळा फोन केला होता, तर तिने तिच्या स्टाफला तब्बल 502 वेळा कॉल केला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे करण्यास बिहारचे राज्यपालांनी मान्यता दर्शवली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस (Mumbai Police) करत आहेत. हा तपास सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे.