Epilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई!
Bandra Worli Sea Link | (Photo Credits: Facebook)

आजपासून (26 मार्च) 'पर्पल वीक'ला (Purple Week) सुरुवात होत आहे. न्युरोलॉजिकल डिसऑर्डर epilepsy (आकडी येणे) याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी हा आठवडा साजरा केला जातो.

जगभरातील सुमारे 100 देशात पर्पल वीक किंवा epilepsy week साजरा केला जातो. epilepsy week साजरा करण्यासाठी मुंबापुरी देखील सज्ज झाली आहे. मुंबईतील Epilepsy Foundation चे संस्थापक डॉ. निर्मल सुर्या (Dr. Nirmal Surya) यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्पल वीक सेलिब्रेट केला जाणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बांद्रा-वरळी सीलिंक पर्पल लाईट्सने सजवण्यात येणार आहे. सीलिंक प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि जनरल पोस्ट ऑफिस इमारतीवर देखील पर्पल रंगाची रोषणाई करण्यात येणार आहे. यंदा पर्पल वीकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याने सेलिब्रेशनसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

पर्पल वीक का सेलिब्रेट केला जातो आणि पर्पल रंगच का वापरला जातो?

दरवर्षी 26 मार्चला साजरा केल्या जाणाऱ्या पर्पल वीकबद्दल अनेकांना माहिती नाही. मात्र याची सुरुवात कॅसिडी मेगॅन (Cassidy Megan) नावाच्या एका 9 वर्षांच्या मुलीने केली. तिने सुरु केलेल्या या विशेष कार्यक्रमाला आता आंतरराष्ट्रीय स्तर प्राप्त झाला आहे.

याबद्दल कॅसिडीने सांगितले की, "मी वयाच्या सातव्या वर्षी epilepsy ला बळी पडले आणि या आजारातून जाणाऱ्या लोकांना मी एकटा/एकटी नाही, हे जाणवून देण्यासाठी मी या पर्पल वीकची सुरुवात केली."

लव्हेंटर हा epilepsy चा अधिकृत रंग असून 'पर्पल वीक' बोलणे देखील लोकांना सोपे जाईल, असा विचार करुन मी याची सुरुवात केली.

पर्पल वीकसाठी बांद्रा वरळी सीलिंगवरच रोषणाई का?

पर्पल वीकनिमित्त शहरातील काही भाग पर्पल करण्याच्या कल्पनेवर कॅसिडी म्हणते, "गाव किंवा शहर पर्पल रंगात नटवणं याचा अर्थ epilepsy असणारी लोकं एकटी नसून त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब, मित्र-मैत्रिणी, समाज, सरकार, शाळा, शहर सारं काही आहे. तसंच epilepsy बद्दल असलेले अज्ञान दूर करुन त्याबद्दल अधिकाधिक लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे, हा या संकल्पनेमागील उद्देश आहे.

Epilepsy Foundation India चे संस्थापक आणि चेअरमन डॉ. निर्मल सुर्या यांनी सांगितले की, "काळानुसार, फक्त मुंबईतूनच नाही तर राज्यातील विविध भागातून पर्पल वीकला चांगला पाठिंबा मिळत आहे. Epilepsy Week निमित्त बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुणे, नागपूर, हैद्राबाद आणि इतर शहरांतून अनेक लोक येतात."