मराठी ग्राहकांना (Marathi Customers ) आता फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाईन सेवा देणाऱ्या ई कॉमर्स अॅपमध्ये मराठी भाषा वापरता येणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि फ्लिपकार्ट यांच्यात पत्रव्यवहार झाला होता. त्यानुसार फ्लिपकार्टने आपला शब्द पाळला आहे. फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा(Flipkart in Marathi ) पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला फ्लिपकार्टचीच एक स्पर्धक कंपनी असलेल्या अॅमेझॉन (Amazon) आणि मनसे यांच्यात मात्र जोरदार संघर्ष नुकताच पाहायला मिळाला होता.
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी इतर भाषांप्रमाणे ग्राहकांना मराठी भाषेचा पर्यायही उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली होती. त्याबाबत आगोदर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन कंपनीसोबत पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार फ्लिपकार्टने आपला शब्द पाळला आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन दिला नाही तर त्यांना मनसेस्टाईल धडा शिकवला जाईल असा इशारा मनसेने दिला होता.
मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन दिल्यानंतर आता फ्लिपकार्ट अॅप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा एकूण सहा भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. मराठी भाषेचे महत्व असे की, देशभरात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषांपैकी मराठी ही तिसऱ्या क्रमांकाची बोलीभाषा आहे. या दाव्याला 2011 मध्ये झालेल्या जनगणनेचा आधार आहे. (हेही वाचा, MNS vs Amazon: अॅमेझॉनवर लवकरच दाखल होणार मराठी भाषेचा पर्याय; मनसे नेते अखिल चित्रे यांची ट्विटद्वारे माहिती)
मराठी भाषेत वापरकर्त्यांना अधिकाधिक सूसूत्रता अनुभवता यावी यासाठी फ्लिपकार्टने भाषांतर आणि लिपी यांमध्ये सुमारे 5.4 दशलक्ष शब्दांचे भाषांतर आणि लेखण (ट्रान्सलिटरेशन) उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रात 'राज'भाषेचा सन्मान राखला गेलाच पाहिजे!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर अमेझॉनने तंत्रप्रणालीमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासंबंधी अनुकूलता दाखवली आहे. https://t.co/H0t9Ifirni
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 26, 2020
दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यानंतर अॅमेझॉननेही अॅपवर मरठी भाषेचा वापर करण्यास तयारी दर्शवली आहे, असे मनसेने म्हटले आहे. मनसेने ट्विट करुन माहिती देताना म्हटले आहे की, महाराष्ट्रात 'राज'भाषेचा सन्मान राखला गेलाच पाहिजे! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर अमेझॉनने तंत्रप्रणालीमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासंबंधी अनुकूलता दाखवली आहे.