बीड जिल्ह्यातून शेतकरी आत्महत्यांची (Farmer Suicide Ratio In Beed District) धक्कादायक आकडेवारी पुढे येत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या केवळ 11 महिन्यांच्या काळात बीड जिल्ह्यात (Beed District) एकूण 160 शेतकरी आत्महत्या ( Farmer Suicide) झाल्याची नोंद शासन दप्तही झाली आहे. या आत्महत्यांचा दिवसांचा सरासरी दर सव्वादोन दिवसाला एक तर हेच प्रमाण तासात पाहिले तर प्रती 54 तासांमागे एक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दिसते. कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक गर्तेत ढकलला जातो. तर कधी दुष्काळ नसला तरी गारपीठ, शेतमालांचे कोसळणारे भाव आणि रोगराई, टोळधाड अशा विविध कारणेही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालताना दिसतात.
शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मतदीला कधी कधी प्रशासनाची दप्तरदीरंगाईसुद्धा कारणीभूत ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. बीड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या 160 शेतकऱ्यांपैकी जवळपास 67 प्रकरणे प्रशासनाने निकाली काढली आहेत. तर 50 प्रकरणांमध्ये संबंधित आत्महत्या या मदतपात्र नाहीत असा शेरा मारण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मोसमी शेती करतात किंवा त्यांना मोसमी शेतवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जिल्ह्यात फळबागा, बागायती, भाजीपाला आदींचे क्षेत्रही तसे बरेच अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नागरिक हे स्थलांतर करतात किंवा ऊस तोड मजूर म्हणून कामाला जातात. पाणी टंचाई आणि वीजटंचाई अशाही गोष्टींचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. (हेही वाचा,Farmers Protest: शेतक-यांच्या मागण्यांसंदर्भात येत्या 9 डिसेंबरला शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट )
एका रिपोर्टनुसार बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. प्रशासनाकडील माहितीनुसार बीड जिल्ह्यात आतापर्यंत 160 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी 67 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी पातळवरून केली जाणारी मदत मिळाली आहे. तर 50 शेतकऱ्यांच्या आत्महत्या निकषात न बसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत मिळू शकली नाही. उर्वरीत 43 प्रकरणं ही चौकशीसाठी जिल्हास्तरीय समितीसमोर आहेत, अशी माहिती आहे.