ED raid at YesBank founder Rana Kapoor's residence at Samudra Mahal (PC - ANI)

Yes Bank Crisis: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर (YesBank Founder Rana Kapoor's)  यांच्या वरळीतील 'समुद्र महल' (Samudra Mahal) घरावर ईडीने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला. राणा कपूर यांच्यावर ईडीने (Enforcement Directorate) मनी लाँड्रिंग (Money Laundering) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच राणा कपूर यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे कपूर यांना देश सोडून जाता येणार नाही. राणा कपूर यांच्यावर डीएचएलएफ (DHFL) ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

राणा कपूर यांच्यावर डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. येस बँकेने डीएचएलएफ ला 3600 कोटींचं कर्ज दिलं होतं. राणा कपूर यांनी येस बँकेद्वारे आपल्या अधिकारात नियमबाह्य कर्ज वाटप केलं आहे. कपूर यांनी आपल्या वैयक्तिक संबंधातून हे कर्ज वाटप केल्याचंही उघडकीस आलं आहे. (हेही वाचा - ठाकरे सरकारने 100 दिवसांत काय केलं? पहा सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 111 सेकंदात 'हा' व्हिडिओ)

दरम्यान, कपूर यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या खात्यात अनेकदा मोठी रक्कम परदेशातून आल्याची माहिती ईडीच्या हाती लागली होती. सध्या येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले असून खातेदारांना महिना भरात फक्त 50 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तसेच ग्राहकांनी येस बँकेतील आपले पैसे काढण्यासाठी एटीएम तसेच बँकांमध्ये गर्दी केली आहे.