शिवसेना 111 सेकंद व्हिडिओ (PC - Facebook)

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Govt) 100 दिवस पूर्ण झाले आहेत. याचं निमित्तने शिवसेनेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ठाकरे सरकारच्या 100 दिवसांचा कामाचा लेखाजोखा 111 सेकंदात मांडण्यात आला आहे. या व्हिडिओमधून सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांचा धावता आढावा घेण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये ठाकरे सरकारचा नवा महाराष्ट्र दाखवत आहोत. सज्ज आहात का? असा पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेसाठी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेतले, हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. यात ठाकरे सरकारच्या शेतकरी कर्जमुक्तीचाही उल्लेख आहे. तसेच यात शिवभोजन थाळी, मराठा आंदोलन, कोरेगाव-भीमा, नाणार प्रकल्प, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, औरंगाबाद विमानतळाला दिलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव आदी घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. (हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लखनौहून अयोध्येच्या दिशेने रवाना; 7 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

दरम्यान, शिवसेनेने आपल्या ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी 100 दिवसांत वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्येदेथील ठाकरे सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचा धावता आढावा घेण्यात आला आहे. आज उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.