निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने दाखल केलेल्या याचिकेवर, 16 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. मुकेश सिंह याने  माजी वकिलाविरूद्ध कारवाईची मागणी केली आहे.

मीडिया वन टीव्ही चॅनेल आणि एशियानेट न्युज टीव्ही चॅनेलच्या कोणत्याही प्रकारच्या प्रसारणासाठी घातलेली बंदी ही, चुकून घातली गेली असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मान्य केले आहे. मंत्रालयाकडून काही भागात गैरप्रकार झाल्याचे लक्षात आल्यास, योग्य ती पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून आतापर्यंत 690 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. शस्त्र कायद्यांतर्गत 48 गुन्हे दाखल आहेत व एकूण 2193 लोकांना अटक किंवा ताब्यात घेण्यात आले आहे.

 

जम्मू-काश्मीर सरकारच्या  शालेय शिक्षण संचालनालयाने जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमधील प्राथमिक वर्ग 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीर मध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद -जालना रोडवर धूत हॉस्पिटल समोर भरधाव ट्रकने तीन महिलांना धडक दिल्याने भीह्सणं अपघात घडल्याचे समजत आहे या महिला लग्नाला जाण्यासाठी निघाल्या होत्या या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या असून एकीची परिस्थिती नाजूक आहे.  

नागपूर मधील दिघोरी पुलाजवळ इम्रान सिद्दकी नावाच्या तरुणावर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.  इम्रानला दोन गोळ्या लागल्या असून  रफिक नावाच्या गुंडाने गोळ्या चालवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला संपत्तीच्या वादातून झाला असल्याची शक्यता आहे,  

कोरोना व्हायरसची आणखी 2 प्रकरणे लडाख मध्ये तर आणि 1 प्रकरण तामिळनाडू मध्ये आढळून आले आहे, सोबतच कोरोना व्हायरसची भारतातील एकूण संख्या 34 वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे  विशेष सचिव संजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दिल्ली-जयपूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग आज कोसळला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

  

शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नातं आहे हे दाखवावं लागतं. मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल, असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.  

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासमवेत राम लल्लाचे दर्शन घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता ते हॉटेलच्या दिशेने रवाना झाले आहेत.  

Load More

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्याला जाणार आहेत. अयोध्यत गेल्यानंतर ठाकरे राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. मात्र या दौर्‍यावरही कोरोना विषाणूचे सावट दिसून येत आहे. अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरे शरयू आरती करणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

आजचा दिवस महाविकास आघाडी सरकारसाठी महत्त्वाचा आहे. आज महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. विरोधी पक्षांनी केलेल्या वेगवेगळ्या दावे आता फोल ठरले आहेत. आज शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर याच पार्श्वभूमीवर निशाणा साधला आहे. नवं सरकार शंभर तासही चालणार नाही असे दावे जे ‘ऐंशी तास’वाले करीत होते, त्यांना तसेच बोंबलत ठेवून सरकारने शंभर दिवसांत बरेच काही करून आणि घडवून दाखवले. जनतेच्या मनात जी अविश्वासाची किरणे होती त्यांचे रूपांतर विश्वासाच्या किरणांत करण्याची किमया ‘ठाकरे सरकार’ने शंभर दिवसांत केली, असे म्हणत शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधला आहे.

काही सरकारे फक्त दिवस ढकलतात किंवा मोजत बसतात. पंधरा दिवसांचा टप्पा पार केला तरी जाहिरातरूपाने उत्सव साजरा करतात. अशा जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे गेल्या शंभर दिवसांत महाराष्ट्रात फाटलेच आहेत, अशी टीकाही सामनातून भाजपवर करण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

तसेच जागतिक पातळीवर थैमान घातलेल्या जीवघेण्या विषाणूमुळे अनेकांचा बळी गेला आहे. भारतातही करोनाचे रुग्ण आढळल्याने मास्कच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. मात्र वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मास्कची साठेबाजी होऊ नये, यासाठी औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विकू नयेत, असे निर्देश राज्याच्या अन्न व औषध विभागाने दिले आहेत.