पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला असल्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे. परंतु त्यांनी हा फोन खरंच केला होता का आणि त्यांच्यात काय संभाषण झालं हे जाणून घेऊया सविस्तर...
मोदी-पवार यांच्यातील फोन ही भाजपाची नवी खेळी मानली जात आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं असं मत आहे की या भाजपने पसरवलेल्या फक्त अफवा आहेत.
शिवसेना सध्या सरकार स्थापन करण्याच्या निर्णयात मुख्यमंत्री पदावरून आडमुठेपणा करत आहे. आणि त्यांना सरळ करण्यासाठी भाजपने ही नवी खेळी आखली आहे.
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात फोनवर संभाषण झाल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे.
दरम्याम सरकार स्थापनेच्या गणितात, आमचा पाठिंबा भाजपच्या पर्यायी सरकारला असेल असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या नवाब मलिक यांनी शिवसेनेला समर्थन दिले आहे.
अजित पवार यांची NCP च्या विधीमंडळ नेतेपदी निवड; मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घोषणा
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्या विधिमंडळ परिसरात एक बैठक सुरु आहे. आणि या बैठकीत अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या आमदारांनी नेतेपदी निवडले आहे.