मुंबईमध्ये आज महाराष्ट्र विधीमंडळाच्या नेतेपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 24 ऑक्टोबर दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यावेळेस मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 54 जागांवर राज्यांत विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ नेतेपदी बहुमताने निवड; शिवसेना आमदारांची उद्या बैठक.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत एनसीपीच्या कार्यालयात आयोजित बैठकीत अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 65 हजार मताधिक्याने विजय मिळवला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: दीड लाखांपेक्षा मतांनी अजित पवार झाले विजय, जाणून घ्या राज्यात अधिक मतांनी विजयी होणार उमेदवार.
ANI Tweet
Ajit Pawar has been appointed as Legislative Party leader of Nationalist Congress Party (NCP). (File pic) #Maharashtra pic.twitter.com/Qp2zxMv84R
— ANI (@ANI) October 30, 2019
दरम्यान मुंबईत बोलताना लोकसभा निवडणुकीनंतर 6 आमदारांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्यानंतर 10 ते 12 आमदार सोडून गेले. मात्र, शरद पवार यांनी आपल्या कर्तबगारीवर राज्यात काहीही होऊ शकतं हे दाखवून दिलं आहे. दरम्यान सध्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. मात्र शिवसेना 50-50% सत्ता वाटपावर आग्रही असल्याने सेना भाजपासोबत जाणार की राज्यात इतर राजकीय पहायला मिळणार याची उत्सुकता होती. मात्र राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याला सत्तेमध्ये येण्याची इच्छा नसून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रबळ विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत बसेल असं सांगत सार्या चर्चांना पूर्ण विराम लावला आहे.