Dhangar Reservation (Photo Credits-Facebook)

Dhangar Reservation:  सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षण कायदा रद्द केला. त्यामुळे मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. ऐवढेच नव्हे तर येत्या 16 जून पासून कोल्हापूरात आंदोलन करण्याचा इशारा या समाजाकडून देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त राज्य सरकारने या समाजाच्या आरक्षणासंदर्भात दोन दिवसांचे विशेष अधिवेश बोलवण्याची तयारी करत आहेत. अशातच आता धनगर समजाने सुद्धा आपली बाजू मांडली आहे. धनगर समाजाने असे म्हटले आहे की, आमच्या समाजाचा सुद्धा प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावला पाहिजे. अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणारी शासकीय पूजा सुद्धा होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.(Maratha Reservation: उदयनराजे भोसले यांना भेटल्यानंर मराठा आरक्षण मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांचे महत्त्वपूर्ण विधान)

धनगर आरक्षण कृती समितीने आज पंढरपूरातील अहिल्याबाई होळकर वाड्यामध्ये एक बैठक बोलावली होती. त्यावेळी समाजाच्या आरक्षणाबद्दलच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्य सरकार जर मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावणार असेल तर त्यांनी यावेळी धनगर समाजासाठी सुद्धा कायदा करावा अशी मागणी या समितीकडून करण्यात आली आहे. परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल निर्णय न घेतल्यास शासकीय पूजेला सुद्धा येऊ देणार नाही असा इशारा समितीकडून उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे.(Maratha Reservation: मोठी बातमी! संभाजीराजे यांच्या मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी)

दरम्यान, मराठा समाजासाठी बोलण्यात येणाऱ्या विशेष अधिवेशनाात राज्य सरकारने धनगर समाजाचा प्रश्न उपस्थितीत करण्यासह 'ढ' आणि 'र' संदर्भात जो संभ्रम आहे त्याबद्दल ही स्पष्ट करावे. तर आता धनगर समाजाने दिलेल्या या इशाऱ्यामुळे सुद्धा आंदोलन पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.