Maratha Reservation: उदयनराजे भोसले यांना भेटल्यानंर मराठा आरक्षण मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांचे महत्त्वपूर्ण विधान
Udayanraje Bhosale and Sambhajiraje Chhatrapat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) या विषयावर गेली प्रदीर्घ काळ चर्चेत असलेली खासदार संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati )आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यातील भेट अखेर पार पडली. पुणे (Pune) येथे झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षण आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले की, आम्ही दोघेही एकाच घराण्याचे आहोत. त्यामुळे इथे वेगळ्या विषय येत नाही. मराठा आरक्षणासंदर्भाद दोन्ही घराण्यांचे एकमत आहे. दोन्ही घराणी एकत्र आली असल्याची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली. उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, इथे घराण्यांचा विषय येत नाही. संभाजीराजे यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे.

खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्यात पुणे येथील औंध बॅनर रस्ता येथे उदयनराजे भोसले यांच्या मित्राच्या घरी ही भेट झाली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजे छत्रपती यांनी बोलताना या वेळी सांगितले की, सातारा आणि कोल्हापूर ही दोन्ही घराणी मराठा समाजाच्या मुद्द्यावर एकत्र आली आहेत. बऱ्याच वर्षांनी आम्ही एकत्र भेटलो. या भेटीचा आनंद झाला. उदयनराजे भोसले यांनी भेट घेण्यासाठी परवाच बोलावले होते. परंतू काही कारणांनी भेट होऊ शकली. अखेर आज भेट झाली, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी व्यक्त केली. संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी सांगितले की, आम्ही सरकारसमोर प्रामुख्याने सहा मागण्या ठेवल्या आहेत. या मागण्यांबाबत सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. (हेही वाचा, Maratha Reservation: अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यात भेट, मालोजीराजे यांचीही उपस्थिती; कोल्हापूरातील भेटीची राज्यभरात चर्चा)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. याबाबत विचारले असता संभाजीराजे म्हणाले, 'अजित पवार हे छत्रपती शाहू महाराज यांचे आशिर्वाद घेण्यासाठी गेले असतील तर आनंद आहे. मला या भेटीबाबत कल्पना नव्हती. या भेटीबाबत मला पॅलेसमधून फोन आला होता. परंतू, अजित पवार यांचा फोन अथवा तसा काही निरोप नव्हता. या भेटीबाबत मला व्यक्तिगत माहिती नव्हती.'

सरकारने मराठा समाजाला लवकरता लवकर आरक्षण द्यावे. आरक्षणास जेवढा विलंब लागेल तवढा जनतेच्या मनात विद्रोह वाढत जाईल. या विद्रोहाचा उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार असेल. उद्रेक झाल्यानंतर मी किंवा संभाजीराजे छत्रपती हे देखील काही करु शकणार नाहीत, असे उदयनराजे यांनी सांगितले.